‘कबाली’चे मेकर्स चितींत, डॉयलॉग प्रमो लीक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 22:12 IST
बॉलिवूडमध्ये सलमान, शाहरूख, आमीर यांचा चित्रपट तयार होण्यापूर्वी तो खरेदी करण्यासाठी वितरकांच्या रांगा लागतात. साऊथ फिल्मसिटीत काहीसे असेच मेगास्टार ...
‘कबाली’चे मेकर्स चितींत, डॉयलॉग प्रमो लीक!!
बॉलिवूडमध्ये सलमान, शाहरूख, आमीर यांचा चित्रपट तयार होण्यापूर्वी तो खरेदी करण्यासाठी वितरकांच्या रांगा लागतात. साऊथ फिल्मसिटीत काहीसे असेच मेगास्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांबद्दल घडते. रजनीकांत यांचा आगामी ‘कबाली’ या चित्रपटाबद्दलही नेमके असेच झाले. रजनीकांत यांचा हा चित्रपट तयार होण्यापूर्वी २०० कोटींना विकल्या गेला. सुमारे ५००० स्क्रीन्सवर एकाचवेळी ‘कबाली’ रिलीज करण्याची निर्मात्यांची योजना आहे. याशिवाय चित्रपटाच्या ग्रँड प्रमोशनसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. पण हे सर्व सुरु असताना ‘कबाली’च्या मेकर्सला एका गोष्टीने चिंतेत टाकले आहे. उद्या १२ जूनला ‘कबाली’ चा आॅडिओ लॉन्च होणार आहे. पण त्यापूर्वीच इंटरनेटवर ‘कबाली’च्या आॅडिओचे पायरेटेड वर्जन लीक झालेले निर्मात्यांना आढळून आले आहे. ‘कबाली’ चे म्युझिक डायरेक्टर संतोष नारायणन यांनी स्वत: टिष्ट्वटरवर ही माहिती दिली आहे. केवळ एवढेच नाही तर ‘कबाली’मधील रजनी यांचा एक डॉगलॉग प्र्रमोही लीक झालायं..अर्थात याने तसा फरक पडणार नाहीयं. कारण शेवटी रजनी तो रजनी है...रजनीला पाहण्यासाठी चाहते आतूर असणारच..