Join us  

Justin Bieber's Wedding : जस्टिन बीबरने केले दुस-यांदा लग्न, समोर आले Grand Wedding फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 6:33 PM

Justin Bieber's Wedding : गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काही तरी बिनसल्या असल्याच्या चर्चा होत्या. मात्र अशा प्रकारे ग्रँड वेडींग करत त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यात सर्वकाही सुरळीत सुरू असल्याचे दाखवून दिले आहे. 

जस्टिन बीबर आणि मॉडल हॅली बाल्डविन यांनी पुन्हा एकदा लग्न करत आपले लग्नाचे खास फोटो फॅन्सह शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. दोघांनीही त्यांच्या एंगेजमेंट एनिव्हर्सरीचे निमित्त साधत पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 154 नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी ग्रँड वेडिंग केले. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काही तरी बिनसल्या असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र अशा प्रकारे ग्रँड वेडींग करत त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यात सर्वकाही सुरळीत सुरू असल्याचे दाखवून दिले आहे. 

यावेळी हॅलीने व्हाइट वेडिंग गाउन परिधान केला होता तर जस्टीनही ब्लॅक टक्सीडोमध्ये खूप स्टायलिश दिसत होता. गेल्याच वर्षी दोघांनी कोर्टमॅरेज केले होते. तुर्तास या लॅव्हीश ग्रँड वेडींगचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 2016 पासून जस्टीन हॅलीला डेट करत होता. दोघांना कायमच एकत्र पाहायला मिळायचे. त्यांच्या फोटोमध्ये ते आकंत एकमेकांच्या प्रेमात फुल्ल ऑन बुडाल्याचं पाहायला मिळायचे. मात्र काही दिवसानंतर  दोघांमध्ये काही तरी बिनसल्याची अफवा उठल्या.त्याचदरम्यान त्यांनी दोघांनी आपल्या नात्याला नव्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेत नोव्हेंबरमध्ये कोर्ट मॅरेजही केले.

यापूर्वी  2010 मध्ये जस्टिन बीबर सेलेना गोमेजसह रिलेशनशिपमध्ये होता.  मात्र या दोघांचे नाते फार काळ काही टिकु शकले नाही. 2014 मध्ये दोघांचे ब्रेकअपही झाले. जस्टीन बीबरची तरूणाईत प्रचंड क्रेझ आहे. त्याची सगळी गाणी लोकप्रिय आहेत.  विशेषत: 'बेबी, 'लव्ह युवरसेल्फ', 'से सॉरी', 'वॉट डू यू मीन लेट मी लव्ह यू' ही गाणी तुफान गाजलीत. 

टॅग्स :जस्टिन बीबर