Join us

‘जुली2’ची लीड अ‍ॅक्ट्रेस राय लक्ष्मी आहे कमालीची बोल्ड ! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST

‘जुली2’चा टीजर रिलीज झाला आणि या चित्रपटाची लीड अ‍ॅक्ट्रेस राय लक्ष्मी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. होय, यापूर्वी २००८ मध्ये राय लक्ष्मी अशीच चर्चेत आली होती. कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनीसोबत मी रिलेशनशिपमध्ये होते, असा दावा करून तिने खळबळ माजवली होती.

‘जुली2’चा टीजर रिलीज झाला आणि या चित्रपटाची लीड अ‍ॅक्ट्रेस राय लक्ष्मी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. होय, यापूर्वी २००८ मध्ये राय लक्ष्मी अशीच चर्चेत आली होती. कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनीसोबत मी रिलेशनशिपमध्ये होते, असा दावा करून तिने खळबळ माजवली होती.साऊथची अतिशय बोल्ड व सेक्सी हिरोईन अशी राय लक्ष्मीची ओळख आहे.‘जुली2’ या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूड डेब्यू करते आहे. याआधी तिने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात सहअभिनेत्रीच्या भूमिका केल्या आहेत. पण लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून तिचा हा पहिला चित्रपट आहे.राय लक्ष्मी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड अन् ग्लॅमरस फोटो ती अपलोड करत असते.राय लक्ष्मीने साऊथच्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. ‘जुली2’ हा तिचा ५० वा चित्रपट आहे.‘जुली2’मध्ये राय लक्ष्मी ९६ वेगवेगळ्या आऊटफिट्समध्ये दिसणार आहे. यात राय लक्ष्मीचा बिकनी लूकही पाहायला मिळणार आहे. या बिकनी लूकसाठी लक्ष्मीला आपले वजन घटवावे लागले.‘जुली2’साठी राय लक्ष्मीने आधी ११ किलो वजन कमी केले आहे आणि नंतर कथेच्या मागणीनुसार, पुन्हा वजन वाढवले.राय लक्ष्मीने वयाच्या पंधराव्या वर्षी अभिनयास सुरुवात केली. २००५ मध्ये आलेल्या ‘कारका कसादरा’ या तेलगू चित्रपटातून तिने डेब्यू केला. त्यानंतर तिने बºयाचशा तामिळ चित्रपटांमध्ये काम केले.पुढे २००७ मध्ये तिने मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली. त्यामुळे तिला एकापाठोपाठ एक चित्रपटांच्या आॅफर्स मिळत गेल्या.