Join us  

जुही चावलाने केला खळबळजनक खुलासा, ही अभिनेत्री माझ्यामुळे बनली स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:44 PM

जुहीनेच ही गोष्ट नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे.

ठळक मुद्देजुही मुलाखतीत मस्करीत हे देखील म्हणाली की, मी राजा हिंदुस्तानी आणि दिल तो पागल है हे चित्रपट नाकारल्यामुळे करिश्माला स्टारडम मिळाले. जुहीने या मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या इगोमुळे काही चित्रपट गमावले.

करिश्मा कपूरने तिच्या कारकिर्दीत दिल तो पागल है, राजा हिंदुस्तानी यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण हे दोन्ही चित्रपट करिश्माला नव्हे तर जुही चावलाला ऑफर करण्यात आले होते. पण जुहीने या चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिल्यामुळे करिश्माला या चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली. जुहीनेच ही गोष्ट राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. 

जुही मुलाखतीत मस्करीत हे देखील म्हणाली की, मी राजा हिंदुस्तानी आणि दिल तो पागल है हे चित्रपट नाकारल्यामुळे करिश्माला स्टारडम मिळाले. जुहीने या मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या इगोमुळे काही चित्रपट गमावले. मला त्याकाळात वाटत होते की, मी चित्रपटांमध्ये काम केले नाही तर इंडस्ट्रीला दुसरा पर्याय मिळणार नाही. मी माझ्या इगोमुळे अनेक चांगल्या संधी धुडकावल्या. मी ज्या लोकांसोबत कर्म्फटेबल आहे, त्यांच्यासोबतच मी त्यावेळी काम करत होते. तसेच मी कठीण भूमिका स्वीकारत नव्हते. याच कारणांमुळे मी काही चित्रपटांना नकार दिला.

जुहीने पुढे सांगितले की, राजा हिंदुस्तानी आणि दिल तो पागल है हे दोन्ही चित्रपट मी नाकारले. पण या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले. हे दोन्ही चित्रपट करिश्माला मिळाले आणि दिल तो पागल है या चित्रपटासाठी तर तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. 

जुही चावलाने 'कयामत से कयामत तक', 'हम है राही प्यार कै', 'डर' आदी बॉलीवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. १९८४ साली मिस इंडिया हा किताब जिंकल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने तिच्या विनोदी टायमिंगने आणि वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना थक्क करून टाकले. तिला नव्वदीच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानले जात असे. तिने तिच्या कारकिर्दीत खूप चांगल्या भूमिका साकारल्या असून या भूमिकांसाठी तिला पुरस्कार देखील मिळाले आहेत. जुही आज तिच्या कुटुंबाला जास्त वेळ देत असल्याने खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. ती आयपीएलच्या कोलकाता टीमची मालकीण देखील आहे.

टॅग्स :जुही चावला करिश्मा कपूर