Join us  

CAA चे केले जुही चावलाने समर्थन, मोदींवर उधळली स्तुतीसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 2:39 PM

Citizen Amendment Act : इथे असे किती जण आहेत ज्यांनी पाच वर्षांत एकही सुट्टी घेतलेली नाही.

देशात सध्या सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नंतर जेएनयूमध्ये घडलेले प्रकरणांमुळे बॉलिवूडमध्ये दोन गट पडल्याचे स्पषट चित्र आहे. बॉलिवूडमधील एक गट या कायद्याला विरोध करतायेत तर दुसरा गट याच्या समर्थनात आहे. अभिनेत्री जुही चावलादेखील सीएएचं समर्थन करताना दिसतेय.  

एका कार्यक्रमादरम्यान जुही चावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक करताना दिसली. जुही चावला म्हणाली, ''इथे असे किती जण आहेत ज्यांनी पाच वर्षांत एकही सुट्टी घेतलेली नाही. फक्त एक व्यक्ती अशी आहे ज्यांनी गेल्या पाच वर्षात एकही सुट्टी घेतली नाहीय ते म्हणजे आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी. मी कोणत्या पक्षाबद्दल किंवा राजकारणाबाबत बोलत नाही. मी एका व्यक्तीबद्दल बोलतेय जे आपलं पंतप्रधान आहेत. ते नेहमीच देशाच्या प्रगतीचा विचार करत असतात. देशाला पुढे घेऊन जाण्याच्या विचारात ते सतत असतात.'' 

जुही पुढे म्हणाली, लोक अचानक सीएएवर आमची मतं विचारु लागली. मात्र सीएएचा मुद्दा अजून आपल्याला नीट कळलेला नाही. तसेच तो इतर लोकांनाही समजलेला नाही. इतक्या पटकन लोक सरकाराला चुकीचे का ठरवतायेत?      

  जुहीने भाजपने मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. जुहीसह या कार्यक्रमात दिलीप ताहिल, भाजप नेते सुधीर मुंनगंटीवार आणि गोपाळ शेट्टी उपस्थित होते. 

टॅग्स :जुही चावला नागरिकत्व सुधारणा विधेयक