Join us  

 ‘कबीर सिंग’ फेम जुबिन नौटियालला सोनू निगमने केले होते रिजेक्ट, आज आहे ‘लाखों दिलांची धडकन’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 11:46 AM

कबीर सिंग, मरजावां आणि बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटात आपल्या आवाजातील गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर जुबिन नौटियाल याचा आज वाढदिवस.

ठळक मुद्दे2014 मध्ये  जुबिनने ‘सोनाली केबल’साठी पहिले गाणे गायले आणि यानंतर कधीच मागे वळून बघितले नाही.

कबीर सिंग, मरजावां आणि बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटात आपल्या आवाजातील गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर जुबिन नौटियाल याचा आज वाढदिवस. 14 जून 1989 रोजी डेहराडून येथे जुबिनचा जन्म झाला.2011 साली जुबिन  ‘एक्स फॅक्टर इंडिया’ या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. हा शो तो जिंकू शकला नव्हता. विशेष म्हणजे शोचा जज सोनू निगमने ऑडिशनराऊंडमध्ये जुबिनला रिजेक्ट केले होते. ऐकून आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. सोनू निगम, श्रेया घोषाल व संजय लीला भन्साळी या शोचे जज होते. जुबिनने ऑडिशन राऊंडमध्ये मोहित चौहानने गायलेले   ‘तुझे भुला दिया’ हे गाणे गायले होते. 

जुबिनचेऑडिशन राऊंडमधील हे गाणे ऐकून सोनू निराश झाला नव्हता.इतका की त्याने जुबिनला थेट रिजेक्ट केले होते. अर्थात श्रेया घोषाल व संजय लीला भन्साळी यांचे मत मात्र वेगळे होते. जुबिनमध्ये प्रतिभा आहे आणि त्याला एक संधी दिली जायला हवी, असे श्रेया व भन्साळींचे मत होते.  सोनूला मात्र हे मान्य नव्हते.

तरीही श्रेया व भन्साळींचे दोन वोट मिळाल्याने जुबिन पुढच्या राऊंडमध्ये गेला होता. सोनूने ऑडिशन राऊंडमध्येच रिजेक्ट केलेला जुबिन आज बॉलिवूडवर राज्य करतोय. बॉलिवूडचा तरूण पिढीचा सर्वाधिक आवडता सिंगर म्हणून तो ओळखला जातो.

2014 मध्ये  जुबिनने ‘सोनाली केबल’साठी पहिले गाणे गायले आणि यानंतर कधीच मागे वळून बघितले नाही. अलीकडे आलेल्या ‘कबीर सिंग’ या सिनेमातील ‘तुझे कितना चाहें और हम’ या जुबिनने गायलेल्या गाण्याने तर कमाल केली. हे गाणे तुफान लोकप्रिय झाले. जुबिनने तामिळ, तेलगू, कन्नड व बंगाली सिनेमांसाठीही अनेक गाणी गायली आहेत.

टॅग्स :सोनू निगमकबीर सिंग