Join us  

वैजयंतीमालाच्या सिनेमाच्या प्रवासचाी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 9:52 AM

भारतीय सिनेमातील एखादी अंतिम उदगाती कोणती अभिनेत्री असेल असा विचार केला, तर ती निश्चितच वैजयंतीमालाच असेल! एक अभिनेत्री, भरतनाट्यम ...

भारतीय सिनेमातील एखादी अंतिम उदगाती कोणती अभिनेत्री असेल असा विचार केला, तर ती निश्चितच वैजयंतीमालाच असेल! एक अभिनेत्री, भरतनाट्यम नृत्यांगना, कर्नाटकी गायिका आणि नृत्य कोरियोग्राफर अशा विविध प्रकारच्या भूमिका वैजयंतीमाला यांनी त्यांच्या प्रसिद्ध करियर मध्ये केलेल्या आहेत. तिने फक्त नृत्याला चंदेरी पडद्यावर आणले नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी बेंचमार्क निर्माण केला आहे. या वीकेंडला एका निवेदनाद्वारे रसाळ जावेद अख्तर, झी क्लासिकच्या वो जमाना करे दीवाना या कार्यक्रमातून वैजयंतीमालाच्या प्रवासावर तपशीलवार प्रकाश टाकणार आहेत.  
लहान वैजयंतीमालाने वया6च्या 6व्या वर्षी व्हॅटिकन सिटी मध्ये पोपच्या समोर तिचे पहिले नृत्य सादर केले होते. जावेद अख्तर यांनी उघड केले की या अभिनेत्रीने पोपनी दिलेले ते मेडल अजूनही मौल्यवान वस्तू म्हणून जपून ठेवलेले आहे. 15व्या वर्षी वैजयंतीमालाने तिचा पहिला तामीळ सिनेमा वझकै (1949) चा करार केला होता. या सिनेमाचा बहार नावाचा हिंदी रिमेक हे वैजयंतीमालाचे बॉलीवूड मधील पहिले पाऊल ठरले, आणि असे करणारी ती पहिली दक्षिण भारतीय अभिनेत्री ठरली. जावेद अख्तर यांनी आठवणी सांगीतल्या प्रमाणे वैजयंतीमाला यांनी इतर दाक्षिणात्य अभिनेत्यांसाठी मार्ग दाखविला जसे की वहिदा रेहमान आणि पद्मिनी यांनीही बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. दक्षिणेकडील असून सुद्धा वैजयंतीमाला या हिंदी सिनेमातील पहिल्या महिला सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध झाल्या.      
त्यांच्या करियरमधील सुरूवातीच्या वर्षात अनेक गाजलेले सिनेमे देणाऱ्या वैजयंतीमाला यांनी इंडस्ट्रीमध्ये वादळ आणले होते. नागीण, साधना, गंगा जमुना आणि संगम यातील तिच्या अभिनयाने ते सिनेमे गाजले होते. देवदास मधील वैजयंतीमालाने केलेली चंद्रमुखी सर्वाधिक गाजली होती. जावेद अख्तर आठवण जागवताना सांगीतले, “एक आकर्षक आणि निष्णात नृत्यांगने शिवाय या सिनेमामुळे त्या एक कुशल अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या. या सिनेमासाठी बेस्ट सपोर्टिंग रोल असे अॅवॉर्ड त्यांना दिले जात असताना त्यांनी ते नाकारले कारण त्यांच्या मते त्यांची भूमिका पारोच्या भूमिके सारखी प्रमुख हिरॉईनचीच होती. असा होता त्यांचा स्वतःविषयीचा आदर!” 
होठों पे ऐसी बात मैं दबा के चली आई, मन डोले मेरा तन डोले, चढ गयो पापी बिचवा, मैं का करु राम मुझे बुढ्ढा मिल गया, ही त्यांची गाणी आणि नृत्ये आजही तितकीच लोकप्रिय आहेत. “मधुमती सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी या अभिनेत्रीच्या पायाला जखम झाली होती पण तरीही तिने त्यातील सर्व गाण्यांवर विनासायास नृत्य केले होते त्यातील चढ गयो पापी बिछुवा हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे हे कुतुहलजनक आहे,” म्हणाले जावेद अख्तर.