Join us  

जॉन अब्राहमच्या पत्नीने शेअर केले त्यांच्या लग्नातील काही खास फोटो, पाहा त्यांचे रोमँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 1:55 PM

प्रियाने शेअर केलेल्या फोटोत प्रिया आणि जॉनसोबत आपल्याला त्यांचे संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे. तसेच तिने त्या दोघांचा एक रोमँटिक फोटो देखील पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देया फोटोत ते दोघे रोमँटिक अंदाजात नारळाचे पाणी पिताना दिसत असून प्रिया जॉनला किस करत आहे.

जॉन अब्राहम बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते. जॉन त्यांच्या मुलाखतींमध्ये त्याच्या रिल लाईफबद्दल भरभरून बोलतो. पण आपल्या रिअल लाईफबद्दल बोलणे मात्र त्याला अजिबात आवडत नाही. त्याची पत्नी प्रिया ही सुद्धा लाईमलाईटपासून दूर राहते. पण अलीकडे प्रियाने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर जॉन आणि तिच्या लग्नातले अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

प्रियाने शेअर केलेल्या फोटोत प्रिया आणि जॉनसोबत आपल्याला त्यांचे संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे. तसेच तिने तिचा आणि जॉनचा एक रोमँटिक फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोत ते दोघे रोमँटिक अंदाजात नारळाचे पाणी पिताना दिसत असून प्रिया जॉनला किस करत आहे. जॉन आणि प्रियाचे खूपच कमी फोटो त्याच्या चाहत्यांना आजवर पाहायला मिळाले आहेत. त्यामुळेच त्यांचे हे फोटो पाहून जॉनचे चाहते प्रचंड खूश झाले असून या फोटोंना खूप सारे लाईक्स मिळाले आहेत. तसेच या फोटोवर जॉनचे चाहते भरभरून कमेंट देखील करत आहेत. 

प्रिया मीडियापासून दूर का राहाते याविषयी एका मुलाखतीत जॉनने सांगितले होते. तो म्हणाला होता की, ‘मला पापाराझी कल्चर अजिबात आवडत नाही. विशेषत: मी पत्नीसोबत क्वालिट टाईम घालवत असताना मला ते अजिबात आवडत नाही. मी प्रायव्हेट पर्सन आहे आणि माझी पत्नी प्रिया ही माझ्यापेक्षाही प्रायव्हेट पर्सन आहे. तिची हीच गोष्ट मला सर्वाधिक आवडते. प्रिया सतत कामात बिझी असते. पण पडद्यामागे. सध्या ती माझी फुटबॉल टीम सांभाळतेय. एका टीमला हाताळणे कुठल्या प्रॉडक्शन टीमला हाताळण्यासारखे आहे.

जॉन आणि प्रिया २०१४ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकले. प्रियाचा जन्म अमेरिकेत झाला असून, ती एक इन्व्हेस्टमेंट बॅँकर आहे. प्रियासोबत लग्न करण्याअगोदर जॉनचे अभिनेत्री बिपाशा बसू हिच्याशी अफेयर होते. दोघे लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. परंतु काही कारणास्तव त्यांच्यात ब्रेकअप झाले. 

टॅग्स :जॉन अब्राहम