जॉन अब्राहमच्या ‘परमाणू’चा ट्रेलर अखेर रिलीज; बघून अंगावर शहारे येतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 20:08 IST
अभिनेता जॉन अब्राहम याच्या आगामी ‘परमाणू’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यामधील दृश्य बघून अंगावर शहारे येतील.
जॉन अब्राहमच्या ‘परमाणू’चा ट्रेलर अखेर रिलीज; बघून अंगावर शहारे येतील!
गेल्या बºयाच काळापासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेला अभिनेता जॉन अब्राहमच्या ‘परमाणू’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. जॉनने स्वत:च त्याच्या ट्विटरवर ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले की, कशा पद्धतीने भारताने जगाला चकमा देत पोखरणमध्ये ‘परमाणू’ परीक्षण केले. चित्रपटात जॉन दमदार भूमिकेत बघावयास मिळत असून, कथा रोमांच निर्माण करणारी आहे. त्याचबरोबर चित्रपटातील डायलॉगही दमदार आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच, ‘जो भी यह काम करेगा उसे ना कोई आॅफिशियल पोस्ट मिलेगी, ना सैलरी, ना मेडल, ना फेम’ या डायलॉगने होते. यावेळी जॉनचा अंदाज बघण्यासारखा असतो. पुढच्या डायलॉगमध्ये जॉन म्हणतो की, ‘अमेरिकेने हजारापेक्षा अधिक अॅटमबॉम्ब टेस्ट केले आहेत. त्यांच्या पावलावर चीनने पाऊल ठेवले आहे. चीनने आतापर्यंत ४३ टेस्ट केल्या असून, एकापाठोपाठ एक असे अॅटमबॉम्ब ते पाकिस्तानला सप्लाय करीत आहेत. ‘नाऊ इट्स टाइम फॉर इंडिया टू बीकम ए न्यूक्लिर स्टेट.’ दरम्याज, जसजसा हा ट्रेलर पुढे जातो तसतसे अंगावर शहारे निर्माण करणारी दृश्ये बघावयास मिळतात. देशाच्या अनुशक्तीवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, चित्रपट केव्हा प्रदर्शित होईल याविषयी आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरून निर्माते आणि जॉनमध्ये मतभेद झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे सातत्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलाव्या लागल्या. आता ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्याने चित्रपटही लवकरच चित्रपटगृहात बघावयास मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.