Join us  

फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही जॉन अब्राहमचे घर, पहिल्यांदाच बघा आलिशान घराचे Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 4:40 PM

जॉन अब्राहमच्या या घराची विशेष बाब म्हणजे या घराचे इंटेरिअर डिझायन करायला जवळपास १४ महिन्यांचा कालावधी लागला होता. त्याच्या या घराचे इंटेरिअर जॉनचा भाऊ एलनने डिजाइन केले आहे.

अभिनेता जॉन अब्राहमची  प्रत्येक गोष्ट खास असते. मग त्याचा अभिनय असो, डान्स असो किंवा त्याच्या हरकती प्रत्येक बाब रसिकांसाठी स्पेशल असते.म्हणून रसिकांच्या मनात घर केलेल्या आपल्या या लाडक्या अभिनेत्यावर ते जीव ओवाळून टाकण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स वांद्रे इथल्या घराबाहेर गर्दी करुन असतात.

बांद्रामध्ये बँड स्टँड परिसरात जॉन आलिशान घरात राहतो. मुंबईत प्रत्येकाला आपले आलिशान घर असावे अशी इच्छा असते. जॉननही मुंबईत हक्काचे घराचे स्वप्न पाहिले आणि मोठ्या मेहनतीने ते सत्यातही उतरवले आहे.याच घराचे काही फोटो समोर आले आहेत. 

जॉनचे 5000 स्क्वेअरफिट आलिशान आणि शानदार घर आहे. आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. 

या घराची विशेष बाब म्हणजे या घराचे इंटेरिअर डिझायन करायला जवळपास १४ महिन्यांचा कालावधी लागला होता. त्याच्या या घराचे इंटेरिअर जॉनचा भाऊ एलनने डिजाइन केले आहे. य घराचे वैशिष्ट्य म्हणजे जॉनचे घर सी-फेसिंग आहे. 

त्याच्या घरातून समुद्र दिसतो. हे घर इतके आलिशान आणि भव्य आहे की पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जातील. बेडरूम, किचन, ड्रॉइंग रूम, डाइनिंग रूम, हॉल पाहूनच तुम्हाला त्याच्या घराचा अंदाज लावता येतो.

डायनिंगपासून पूल एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी जॉनने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.

जॉन आपल्या फिटनेस आणि बॉडीबाबत बराच काटेकोर आहे. त्यामुळे कुठेही असला तरी तो आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष होऊ देत नाही. हीच बाब लक्षात घेऊन या घरात खास सुसज्ज अशी जिमही उभारण्यात आली आहे.

फिटनेसबरोबरच जॉन बाईकसाठी अगदी वेडा आहे. त्याच्याकडे महागड्या बाईक्सचे कलेक्शन आहे.जॉनच्या बाईक कलेक्शनमध्ये यामाहा आर 1, कावासकी निंजा, डुकाती डिवेल, सुजुकी हायाबुसा, महिंद्रा मोजो यांसारख्या अनेक महागड्या बाईक्स आहेत. त्याच्या यामाहा व्हीएमएक्स या बाईकची किंमत तर 29 लाख रुपये आहे.

तसेच आॅडी क्यू 3, आॅडी क्यू 7, लॅम्बोर्गिनी गॅलार्डो, निसान जीटीआर, मारुती जिप्सी अशा देखील गाड्या त्याच्या कलेक्शनमध्ये आहेत.जॉनकडे आजच्या घडीला 355 कोटीहून अधिक प्रॉपर्टी आहे.जॉन अब्राहम एका चित्रपटात काम करण्यासाठी 15 कोटी घेतो.

तसेच अनेक महत्त्वाच्या ब्रँड्सची तो जाहिरात करतो. यासोबतच तो एक निर्माता आहे. त्याला स्टॉक मार्केटऐवजी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला अधिक आवडते.

टॅग्स :जॉन अब्राहम