Join us  

हात नव्हे हातोडा म्हणा...! या अभिनेत्याच्या हाताचा फोटो पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 1:56 PM

दिग्दर्शकाने शेअर केला फोटो

ठळक मुद्दे‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटासाठी जॉन अब्राहमने खास ट्रेनिंग घेतल्याचे कळते.

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. तूर्तास या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत आहे काय तर फक्त एक हात. पण याला हात नाही तर हातोडा म्हणणे अधिक योग्य ठरेन. हा हात कोणाचा तर जॉन अब्राहमचा. जॉनच्या कोपरापासून ते मुठीपर्यंतच्या हाताचा हा फोटो आहे.दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी इंस्टाग्रामवर ‘सत्यमेव जयते 2’च्या सेटवरच्या जॉन अब्राहमच्या हाताचा एक फोटो शेअर केला आहे. ‘हा हात नव्हे, जॉन अब्राहमचा हातोडा’ असे कॅप्शन देत मिलापने हा फोटो शेअर केला.  फोटोत जॉनच्या हातावरील सगळ्या शिरा ताणलेल्या दिसत आहेत. हा फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

चाहत्यांनी या फोटोवर विविध प्रतिक्रिया दिल्या. अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.  बॉडी फिटनेससाठी ओळखला जाणारा अभिनेता टायगर श्रॉफ  याला देखील जॉनच्या या फोटोवर कमेंट करण्याचा मोह आवरला नाही. टायगरने  Insane असे लिहीत फोटोवर कमेंट केली.

‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटासाठी जॉन अब्राहमने खास ट्रेनिंग घेतल्याचे कळते.  या चित्रपटात जॉनसोबत अभिनेता मनोज बाजपेयी, दिव्या खोसला कुमार, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  

मे महिन्यात 12 तारखेला  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, सत्यमेव जयते 2 सोबत जॉन लवकरच शाहरुख खानसोबत पठाण या बहुप्रतीक्षित चित्रपटात दिसणार आहे.  

टॅग्स :जॉन अब्राहम