Join us  

वाचा बाटला हाऊस का ठरलाय जॉन अब्राहमच्या करियरमधील महत्त्वाचा चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 6:54 PM

बाटला हाऊस या चित्रपटात जॉन एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसत असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देबाटला हाऊस या चित्रपटाने आतापर्यंत 91.76 करोड इतकी कमाई केली असून जॉनच्या आजवरच्या कारकिर्दीतील सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.

बाटला हाऊस हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पहिल्याच दिवसांपासून प्रेक्षकांचे खूपच चांगले प्रेम मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 91.76 करोड इतकी कमाई केली असून जॉनच्या आजवरच्या कारकिर्दीतील सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.

जॉनच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयते या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पण आता या चित्रपटापेक्षा बाटला हाऊसने अधिक व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. जॉनच्या रेस 2 आणि हाऊसफुलने चांगले कलेक्शन केले होते. पण या चित्रपटात जॉन प्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार देखील होते. त्यामुळे बाटला हाऊस हाच चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला आहे. 

बाटला हाऊस हा एक सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. १९ सप्टेंबर २००८ रोजी सकाळी ११ वाजता दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांचे विशेष दल आणि इंडियन मुजाहिदीनचे चार अतिरेकी यांच्यात चकमक झाली होती. दोन तासांच्या धुमश्चक्रीत आतिफ अमिन आणि महम्मद साजिद ठार झाले तर विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा शहीद झाले. याच घटनेवर आधारित हा चित्रपट असून यात जॉन पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारत आहे. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचं नेतृत्त्व केलं होतं. १९ सप्टेंबरच्या रात्री असं नेमकं काय घडलं होतं हे या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आले आहे. 

बाटला हाऊस या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणीने केले असून या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्णा कुमार मोनिशा अडवाणी, मधू भोजवानी, जॉन अब्राहम आणि संदीप लेझेल हे आहेत. या चित्रपटात जॉन प्रमाणेच मृणाल ठाकूरची मुख्य भूमिका आहे. मृणालचा हा दुसरा चित्रपट असून ती नुकती हृतिक रोशनच्या सुपर 30 या चित्रपटात झळकली होती.

टॅग्स :बाटला हाऊसजॉन अब्राहम