Join us  

म्हणून जॉन अब्राहमने बिपाशा बासूसह ब्रेकअप केल्यानंतर साधारण मुलीसह लग्न करणे पसंत केले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 4:07 PM

प्रिया रुंचल त्याच्या पत्नीचे नाव आहे. प्रिया रुंचल एनआरआई आहे पण लग्नानंतर तिने जॉनसोबत मुंबईत राहायचा निर्णय घेतला.

पहिल्याच नजरेत तिनं त्याला क्लीनबोल्ड केलं. तिला पाहताच त्याच्या दिल की घंटी बजने लगी आणि ती त्याच्या आयुष्यात येताच त्याचं आयुष्यच जणू पालटलं. ही सगळी गोष्ट आहे ती अभिनेता जॉन अब्राहमची. लग्नापूर्वी जॉन अब्राहमचेबिपाशा बासूसह अफेअर होते.रुपेरी पडद्यावर जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू या दोघांची केमिस्ट्री रसिकांनी तुफान पसंत केली होती.

रुपेरी पडद्यावर एकत्र काम करता करता दोघांची जवळीक वाढली आणि दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही वर्ष दोघे नात्यात होते मात्र काळानुसार दोघांच्याही नात्यात दुरावा आला आणि ब्रेकअप झाले. ब्रेकअप झाल्यानंतर जॉन अब्राहम पुन्हा एकदा प्रेमात पडला. पण यावेळी तो कोण्या अभिनेत्रीच्या नाहीतर एक साधारण मुलीच्या प्रेमात तो पडला.प्रिया रुंचल त्याच्या पत्नीचे नाव आहे. प्रिया रुंचल एनआरआई आहे पण लग्नानंतर तिने जॉनसोबत मुंबईत राहायचा निर्णय घेतला.

जॉन आणि प्रिया २०१४ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकले. प्रियामुळेच जॉनला नात्याची खरी किंमत समजली. नात्यांकडे पाहण्याचा साकारात्मक दृष्टीत परिवर्तन झाले. प्रियाच्या येण्याने त्याचे आयुष्यच पालटले त्यामुळे प्रियासह लग्नानंतर आज त्याचे वैवाहीक आयुष्य एन्जॉय करत आहे. दोघेही एकमेकांची तितकीच काळजी घेतात. लग्नानंतर दोघांमधले नाते अधिक घट्ट झाले. प्रिया खंबीरपणे जॉनच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते, त्याला पाठिंबा देते. 

प्रिया मीडियापासून दूर का राहाते याविषयी एका मुलाखतीत जॉनने सांगितले होते. तो म्हणाला होता की, ‘मला पापाराझी कल्चर अजिबात आवडत नाही. विशेषत: मी पत्नीसोबत क्वॉलिट टाईम घालवत असताना मी अभिनेता नव्हे तर एक सामान्य माणूस असतो. मी प्रायव्हेट पर्सन आहे आणि माझी पत्नी प्रिया ही माझ्यापेक्षाही प्रायव्हेट पर्सन आहे.

तिची हीच गोष्ट मला सर्वाधिक आवडते. प्रिया सतत कामात बिझी असते. पण पडद्यामागे राहून ती माझ्या कामांमध्ये मला मदत करत असते. सध्या ती माझी फुटबॉल टीम सांभाळतेय. एका टीमला हाताळणे कुठल्या

 

टॅग्स :जॉन अब्राहमबिपाशा बासू