जॉन अब्राहमला लोकांनी का दिला जिमऐवजी शाळेत जाण्याचा सल्ला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 15:56 IST
जॉन अब्राहमच्या ‘परमाणु: द स्टोरी आॅफ पोखरण’ या आगामी चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. जॉनने या चित्रपटाचे शूटींग कधीच संपवलेय. ...
जॉन अब्राहमला लोकांनी का दिला जिमऐवजी शाळेत जाण्याचा सल्ला?
जॉन अब्राहमच्या ‘परमाणु: द स्टोरी आॅफ पोखरण’ या आगामी चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. जॉनने या चित्रपटाचे शूटींग कधीच संपवलेय. सध्या जॉन सोशल मीडियावर या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात बिझी आहे. पण हेच प्रमोशन जॉनला महाग पडलेय. होय,‘परमाणु: द स्टोरी आॅफ पोखरण’चे प्रमोशन करताना जॉन चुकला अन् सोशल मीडियावर ट्रोल झाला. त्याचे झाले असे की, जॉनने twitterवर एक tweet केले. यात त्याने नॉर्थ कोरियाच्या अगदी कालपरवा केलेल्या अणुचाचणीचा उल्लेख करत या अणुचाचणीची आपल्या चित्रपटाशी तुलना केली. यामुळे माझा चित्रपट अधिक प्रासंगिक ठरेल, असे तो म्हणाला. खरे तर जॉनचा ‘परमाणु: द स्टोरी आॅफ पोखरण’हा चित्रपट पोखरण येथे भारताने केलेल्या अणू चाचण्यांवर आधारित आहे. याचा नॉर्थ कोरियाच्या अणुचाचण्यांशी तसाही दूरदूरपर्यंत संबंध नाही. पण जॉनने ओढून ताणून आपल्या चित्रपटाचा संबंध नॉर्थ कोरियाच्या अणुचाचण्यांशी जोडला. मग काय, चाहत्यांकडून ट्रोल तर होणारच ना. ALSO READ : पाहा, ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’’चा फर्स्ट लूक!जॉनच्या या टिष्ट्वटनंतर लोकांनी त्याला जबरदस्त फैलावर घेतले. एका चाहत्याने तर जॉनला जिमऐवजी शाळेत जाण्याचाच सल्ला देऊन टाकला. म्हणजेच एका tweetने जॉनचे चांगलेच हसे झाले. अद्याप जॉनने या ट्रोलिंगवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता तो यावर आणखी काय दिवे पाजळतो, ते बघणे निश्चितच इंटरेस्टिंग ठरणार आहे.गतवर्षी जॉनचे तीन चित्रपट बॉक्सआॅफिसवर रिलीज झाले होते. पण हे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार चालू शकले नाहीत. त्यामुळे जॉनला आपल्या या आगामी चित्रपटाकडून बºयाच अपेक्षा आहेत. त्याचमुळे त्याने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालवले आहे. पण जॉन, जरा विचारपूर्वक़!! आता प्रमोशन करताना आपलेच असे हसू होणार असेल तर बोलण्यापूर्वी विचार केलेला बरा ना!!