Join us  

JNU Attack: या अभिनेत्रीचे आई वडील राहतात जेएनयू कॅम्पसमध्ये, हल्ल्याच्या दिवशी झाली होती चिंतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 12:49 PM

जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात बॉलिवूडची ही अभिनेत्री उतरली होती रस्त्यावर

दिल्ली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU)मध्ये ५ जानेवारीला उशीरा रात्री विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यामुळे स्वरा भास्कर खूप घाबरली होती. त्यानंतर तिने रडत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत स्वराने जेएनयूत पोहचण्यासाठी आवाहन केले होते. स्वरा व्हिडिओत रडताना दिसत होती. यामागचे कारण म्हणजे स्वराचे आई वडील जेएनयूमध्ये राहतात.

स्वरा भास्कर हिने व्हिडिओ शेअर करत लिहिले होते की, अर्जंट अपील, दिल्लीत राहणाऱ्या सर्व लोकांनी प्लीज जास्त संख्येनी जेएनयूच्या गेटवर पोहचा. बाबा गंगनाथकडे. सरकार व दिल्ली पोलिसांवर दबाव टाका की या भागात काहीतरी करा. जेएनयूमध्ये तोंडाला मास्क लावून काही लोक घुसलेत आणि तिथे ते विद्यार्थी व शिक्षकांसोबत वाईट व्यवहार करत आहेत. त्यांना मारत आहेत. कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ९ वाजता ५ जानेवारी, २०२०.

या व्हिडिओत स्वरा सांगताना दिसतेय की, मी स्वरा. प्लीझ हे अर्जंट आहे. जेएनयूमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे.एबीवीपी मास्क लावून तिथे विद्यार्थी व शिक्षकांना पकडून मारत आहेत. शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांना मारत आहेत. माझ्यासाठी हे पर्सनल आहे कारण माझे आई वडील तिथे राहतात. 

स्वराने आणखीन एक ट्विट केले की, माझ्या आईने मला मेसेजच्या माध्यमातून माहिती दिली की ते लोक नॉर्थ गेटसमोर जोराजोरात ओरडत आहेत की देशाच्या गद्दारांना गोळी मारा साल्यांना. 

स्वरा भास्करने दिल्लीतील सामान्य जनतेशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधींच्या ट्विटलाही रिप्लाय देत आवाहन केले की तुम्हीपण जेएनयूमध्ये जाऊन तिथली परिस्थिती पहा.

टॅग्स :स्वरा भास्करजेएनयू