Join us  

डफलीवाले या प्रसिद्ध गाण्यामागची कथा सांगितली जया प्रदा यांनी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 12:38 PM

सरगम चित्रपटामधील डफलीवाले हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. या गाण्यावर लोक फक्त नाचतच असे नाही तर अंताक्षरीमध्येही हे गाणं हमखास गायलं जातं.

ठळक मुद्दे काश्मिरमध्ये शूटिंग करत असताना दिग्दर्शक के विश्वनाथ यांनी ठरवलं होतं की, आपण एवढ्या निसर्गरम्य प्रदेशात आलो आहोत तर आपण एका गाण्याचं शूटिंग करूया त्या गाण्याचं शूटिंग एका दिवसात पूर्ण झालं. हे गाणे इतके सुंदर चित्रीत झाले होते की, ते चित्रपटात घेण्याचे सर्वांनी मिळून ठरवले.

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो सुपर डान्सर मध्ये सगळेच स्पर्धक एकाहून एक दमदार परफॉर्मन्स सादर करत आहेत. शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत असून दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी लावतात. आता बॉलिवूडमधील एकेकाळी सुपरहिट असलेली जोडी प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. 

जितेंद्र आणि जया प्रदा यांची जोडी अनेक वर्षांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे. या कार्यक्रमासाठी त्यांनी दोघांनी नुकतेच चित्रीकरण केले. त्या दोघांना सुपर डान्सर या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचा परफॉर्मन्स प्रचंड आवडला. कोलकात्याच्या सहा वर्षीय रुपसा आणि तिचा सुपर गुरू निशांत यांच्या परफॉर्मन्सला तर त्यांनी चांगलीच दाद दिली. सरगम चित्रपटामधील डफलीवाले हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. या गाण्यावर लोक फक्त नाचतच असे नाही तर अंताक्षरीमध्येही हे गाणं हमखास गायलं जातं. या गाण्यावर या दोघांनी नृत्य सादर केलं. जितेंद्र यांना ही चिमुकली इतकी आवडली की, त्यांनी रुपसाचा उल्लेख दो चोटीवाली छोटी लडकी (दोन वेण्या घातलेली मुलगी) असा केला. या लहानशा ड्रामा क्वीनला बघून जया प्रदा तर थक्क झाल्या. एकही ठेका न चुकवता आणि प्रत्येक भाव उत्कटपणे दाखवून रुपसाने सगळ्यांना तिच्याबरोबर नाचायला प्रवृत्त केलं. 

रुपसाचं कौतुक करताना जया म्हणाल्या की, इतक्या लहान वयात ती नृत्यात निपुण झाली आहे. खरं तर त्यांनीही सहाव्या वर्षीच नृत्य शिकायला सुरुवात केली होती. त्या पुढे म्हणाल्या, डफलीवाले हे गाणं खरं सरगम चित्रपटात घेतलं जाणार नव्हतं. काश्मिरमध्ये शूटिंग करत असताना दिग्दर्शक के विश्वनाथ यांनी ठरवलं होतं की, आपण एवढ्या निसर्गरम्य प्रदेशात आलो आहोत तर आपण एका गाण्याचं शूटिंग करूया आणि चित्रपटात गाण्याचा समावेश करायचा अथवा नाही याचा निर्णय नंतर घेऊया. त्या गाण्याचं शूटिंग एका दिवसात पूर्ण झालं. हे गाणे इतके सुंदर चित्रीत झाले होते की, ते चित्रपटात घेण्याचे सर्वांनी मिळून ठरवले. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला आणि या गाण्याने जवळपास एक कोटी कमावले. त्या दिवसांत ही खूप मोठी रक्कम होती. 

 

टॅग्स :जया प्रदासुपर डान्सरशिल्पा शेट्टीगीता कपूर