Join us  

Jawan : शाहरुखचा ‘जवान’ ओटीटीवर कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 7:14 PM

'जवान'च्या ओटीटी प्रदर्शनाबाबत चर्चा रंगली आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

शाहरुख खानच्या ‘जवान’ने सगळीकडेच धमाका केला आहे. केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगभरात ‘जवान’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. किंग खानच्या ‘जवान’ने चाहत्यांना अक्षरश: वेडं करुन सोडलं आहे. ‘जवान’चे शो हाऊसफूल होत आहेत. ‘पठाण’नंतर शाहरुखच्या जवानबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरल्याचं चित्र आहे. प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच 'जवान'च्या ओटीटी प्रदर्शनाबाबत चर्चा रंगली आहे.

पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर झालं आहे शाहरुखच्या 'जवान'चं शूटिंग, तुम्हाला माहितीये का किस्सा?

‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ची निर्मिती असलेल्या ‘जवान’ चित्रपटाचे ओटीटी राइट्स २५० कोटींना विकले गेले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट प्रदर्शनानंतर ५०-६० दिवसांनी ओटीटीवर पाहता येईल. दिवाळीत शाहरुखचा ‘जवान’ ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. ‘जवान’ चित्रपट एकाहून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. पण, ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’चे याआधीचे ‘डार्लिंग’, ‘बेताल’ हे चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यामुळे शाहरुखचा ‘जवान’ही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्...

‘जवान’ने पहिल्याच दिवशी देशात तब्बल ७५ कोटींची कमाई केली आहे. हिंदीत या चित्रपटाने ६५ कोटींचा गल्ला जमवला. जवान सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत आता पहिल्या स्थानावर आहे. देशातच नव्हे तर जगभरातही शाहरुखच्या जवानने छप्परफाड कमाई केली आहे. ‘जवान’ने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरात प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल १२९.६ कोटींची कमाई केली आहे.

प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारने जवानचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, नयनतारा, विजय सेतुपथी, सुनिल ग्रोव्हर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याबरोबरच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही या चित्रपटात झळकली आहे. हिंदी, तमिळ, तेलुगु या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

टॅग्स :जवान चित्रपटशाहरुख खाननयनतारा