Join us  

जावेद जाफरीचा लेक मिजानला पाहिलंत का? दिसायला आहे खूप हँडसम अन् स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 3:27 PM

जावेद जाफरीचा लेक मिजानने ही बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. त्याच्या लूक्सची तुलना रणबीर कपूरसोबत केली जाते.

बॉलिवूडचे ज्येष्ठ कॉमेडियन जगदीप यांचा नातू आणि अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरी यानेही अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे. मिजानने 2019 मध्येच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, जरी आतापर्यंत त्याच्या कामाला ती ओळख मिळालेली नाही. लूक्स आणि पर्सनलिटीच्या बाबतीत मिजान बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांना टक्कर देतो. 

मिजान त्याच्या फिटनेससाठी खूप मेहनत घेतो, तो जिम लूकमधील त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो, ज्यांना खूप पसंतीही मिळते.

मिजानने 2019 मध्ये 'मलाल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 'मलाल' चित्रपटाची निर्मिती संजय लीला भन्साळी यांनी केली होती, ज्यामध्ये त्यांची भाची शर्मीन सहगलनेही पदार्पण केले होते.यानंतर मिजान 2021 मध्ये शिल्पा शेट्टीसोबत हंगामा 2 मध्ये दिसला. मात्र, हा चित्रपटही काही विशेष कामगिरी करू शकला नाही. मिझान अजूनही यश मिळवण्यासाठी मेहनत घेत आहे. त्याचा यारियां 2 हा चित्रपट मे 2023 मध्ये रिलीज होणार आहे.

चित्रपटांपेक्षा मिजान त्याच्या रिलेशनशीपला घेऊन चर्चेत राहिला आहे. त्याचे नाव अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्याशी जोडले गेले होते, मिजानने ही केवळ अफवा असल्याचे म्हटलं होतं. 

टॅग्स :मिजान जाफरीजावेद जाफरी