Javed Akhtar's birthday party
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 12:20 IST
बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी वुकताट त्यांचा 72वा वाढदिवस साजरा केला. यावेळी जावेद साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
Javed Akhtar's birthday party
बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी वुकताट त्यांचा 72वा वाढदिवस साजरा केला. यावेळी जावेद साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ही बर्थ डे पार्टी जावेद अख्तर यांच्या जुहुतल्या निवासस्थानी शबाना आझमी यांनी आयोजित केली होती. श्री देवी आणि बोनी कपूर ब्लॅक अँड व्हाईट थीममध्ये पार्टी सहभागी झाले होते. वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी मुलगी जोया अख्तर ही आली होती. अभिनेत्री रेखा या सिल्कची गोल्डन साडी परिधान करुन आल्या होत्या. गोल्डन साडीत त्या अतिशय सुंदर दिसत होत्या. बॉलिवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर आपल्या झक्कास अंदाजात पार्टीत सहभागी झाला होता. ऊर्मिला मातोंडकर वनपीसमध्ये भलतीच हॉट दिसत होती. अभिनेता ह्रतिक रोशन पार्टीच्या ठिकाणी दिसला. विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय कपूरसह जावेद साहेबांच्या बर्थ डे पार्टीत आली होती. आपल्या मित्राच्या बर्थ डे पार्टीत निर्माता, दिग्दर्शक महेश भट्ट ही आले होते.