Join us  

जान्हवी कपूरच्या एका सवयीने टेन्शनमध्ये आले होते बोनी कपूर, मग त्यांनी केले असे काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 3:46 PM

जान्हवीच्या एका व्यसनाने बोनी कपूर यांना चिंतेत टाकले होते. याविषयी जान्हवीनेच खुद्द सोशल मीडियाद्वारे सांगितले होते.

ठळक मुद्देगरजेपेक्षा अधिक व्यायाम तुमच्या शरीराला घातक ठरू शकतो, हे या लेखात लिहिले होते. बोनी कपूर यांनी या लेखाचे कटींग जाणीवपूर्वक जान्हवीला पाठवले होते.

जान्हवी कपूरचा आज वाढदिवस असून श्रीदेवी आणि बोनी कपूरच्या या मुलीने धडक या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती लवकरच गुंजन सक्सेना या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 

जान्हवीच्या एका व्यसनाने बोनी कपूर यांना चिंतेत टाकले होते. जान्हवी आणि बोनी कपूर यांच्यातील एक व्हॉटस अ‍ॅप चॅटिंग काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाले होते. खुद्द जान्हवीनेच हे व्हॉटस अ‍ॅप चॅट सोशल मीडियावर शेअर केले होते.

या चॅटमध्ये बोनी कपूर यांनी जान्हवीला एका वृत्तपत्रातील लेखाचे कटींग पाठवलेले होते. या लेखात अतिव्यायाम केल्याने काय नुकसान होते, ते सांगितले गेले होते. गरजेपेक्षा अधिक व्यायाम तुमच्या शरीराला घातक ठरू शकतो, हे या लेखात लिहिले होते. बोनी कपूर यांनी या लेखाचे कटींग जाणीवपूर्वक जान्हवीला पाठवले होते. यावर रिप्लाय देत जान्हवीने तिच्या वडिलांना डोक्यावर हात मारणारा एक इमोजी सेंड केला होता. 

जान्हवी कपूर दररोज न चुकता जिममध्ये जाते. अनेकवेळा पापरझी जिमच्या बाहेर तिची छबी कॅमेऱ्यात कैद करतात. आपल्या सोशल अकाऊंटवरही जान्हवी आपले फिटनेसचे व्हिडिओ शेअर करत असते. व्यायाम करण्याशिवाय जान्हवी राहूच शकत नाही. तिच्या याच व्यसनामुळे बोनी कपूर टेन्शनमध्ये आले होते. याच चिंतेपोटी त्यांनी अतिव्यायामाचे दुष्परिणाम सांगणारा लेख जान्हवीला सेंड केला होता. या गोष्टीला अनेक महिने झाले असले तरी आजही जान्हवी न चुकता जिममध्ये जाताना दिसते. 

जान्हवीने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. ती या चित्रपटात ईशान खट्टरसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसली होती. या चित्रपटातील जान्हवीच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले आणि पाठोपाठ तिला चित्रपटही मिळाले. येत्या काळात जान्हवी धर्मा प्रॉडक्शनच्याच ‘तख्त’ या मल्टिस्टारर चित्रपटात दिसणार आहे. २०२०मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात जान्हवी हिराबाई जैनाबादीची भूमिका करणार आहे. तसेच तिच्या गुंजन सक्सेनाची देखील सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरबोनी कपूरश्रीदेवी