Join us

टायगर झाला जॅकलीनचा सुपरहिरो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 10:23 IST

            पडद्यावर खलनायकांना मारणारा अन नायिकेला वाचवणारा सुपरहिरो तर आपण पाहतोच. प्रत्येक मुलीला आपल्याही ...

            पडद्यावर खलनायकांना मारणारा अन नायिकेला वाचवणारा सुपरहिरो तर आपण पाहतोच. प्रत्येक मुलीला आपल्याही आयुष्यात असाच एकदम भारी सुपरहिरो असावा असे नेहमीच वाटते. मग आशात आपल्या बॉलीवुडच्या सुपरगर्ल कशा काय मागे राहतील. चित्रपटांमध्ये व्हीलन सोबत मारामारी करुन आपल्या हिरोईनला सोडवणारे हिरो तर भाव खाऊन जातात. आता पहा ना काही दिवसांपुर्वी वरुण धवनला ढिशुम म्हणारी आपली किक गर्ल जॅकलीन फर्नांडिसला तिचा सुपरहिरो मिळाला आहे. हो..हो.. हे खरे आहे, जॅकलीनने स्वत:च हे सांगितलेय. तर कोण आहे जॅकलीनचा हा लकी सुपरहिरो असा प्रश्न पडला असेल ना तर जरा थांबा. तो सुपरहिरो दुसरा-तिसरा कोणी नसुन आपल्या बॉलीवुडमधील हॅन्डसम हंक टायगर श्रॉफ आहे. जॅकलिनने नूकताच सोशल साईटवर टायगर सोबतचा फोटो अपलोड केला असुन ति टायगरला तिचा सुपरहिरो म्हणत आहे. हे दोघेही जिम मध्ये वर्क आऊट करीत असुन टायगर त्याचे सिक्स पॅक दाखवित आहे तर जॅकलिन मस्तपैकी पाऊट करुन सेल्फी काढण्यात बिझी आहे. दोघांच्याही या फोटोला आपल्या कडुन तरी एकदम सुपरलाईक