Join us  

कौतुक करावे तितके कमी, लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरली जॅकलिन फर्नांडिस, स्वतः करते जेवणाचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 12:27 PM

कोरोना काळात आपल्या सकारात्मक दृष्टीकोनासोबत, जॅकलीनने त्या लोकांमध्ये प्रेम आणि आनंद पसरवला आहे, ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज होती.

जॅकलिन फर्नांडीस कठीण काळात ज्यांना सर्वाधिक गरज होती त्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे राहिले आहे, मग ते पूरग्रस्तांच्या घरांचे पुनर्निर्माण असो की मुलांच्या पोषणासाठीचे कार्य, आपल्या सकारात्मक दृष्टीकोनासोबत, जॅकलीनने त्या लोकांमध्ये प्रेम आणि आनंद पसरवला आहे, ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज होती.

कोरोना काळात मदतीची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत अभिनेता सलमान खान स्वतः रस्त्यावर उतरून मदत करत आहे. सलमान पाठोपाठ आता जॅकलिन देखील अशाप्रकारे लोकांची मदत करताना दिसली.

 

नुकतेच जॅकलिनने योलो फॉऊडेशनची स्थापना केली. या फॉऊंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळात  मोफत जेवण देत आहेत.‘रोटी बँक’ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून, जॅकलिन या महिन्यात एक लाख लोकांपर्यंत जेवण पोहोचवणार आहे.

इतकेच नाही तर  फीलाइन फाउंडेशनसोबत,  भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी एक उपक्रम सुरु केला आहे. त्यासोबतच, कोविड काळातील फ्रंट लाइन कार्यकर्ता मुंबई पोलिस दलाला मास्क आणि सॅनिटायझरचे देखील वितरण करण्यात येणार आहे.

येलो फॉऊंडेशनची स्थापना केल्याचे जाहीर करताना जॅकलिनने सांगितले होते की, जॅकलिनने आपल्या सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट शेअर करताना लिहिले, आपल्याकडे एकच जीवन आहे, या जगात जे काही आपल्याला करता येईल ते केले पाहिजे. 

मला योलो फाउंडेशन लाँच केले, त्यावर गर्व आहे. चांगुलपणाच्या कथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एका फाउंडेशनची स्थापना केली आहे. या आव्हानात्मक काळात मी, योलो फाउंडेशनने प्रत्येक समाजसेवी संस्थांसोबत भागिदारी केली आहे. जे शक्य आहे ते सर्व आम्ही करतो. 

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस