Join us  

जे बात ! आता मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी धावून आली जॅकलिन फर्नांडिस, होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 4:03 PM

काही दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरुन तिने स्वत: लोकांना जेवणं दिलं होते.

जॅकलीन फर्नांडीसने समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली. अभिनेत्रीद्वारे स्थापन करण्यात आलेल्या 'यू ओनली लिव वन्स' (वायओएलओ) फाउंडेशन अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून काम करणार आहे.  

अभिनेत्रीने आता मुक्या जनावरांसाठी पुढाकार घेतला असून हे  प्राणी माणसांसारखी मदत नाही मागू शकत. जॅकलीनने नुकताच फिलाइन फाउंडेशनला भेट दिली, ज्याचे काही फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले, फिलाइन ही एक अशी सामाजिक संस्था आहे जे भटक्या जनावरांची सहाय्यता करतात.

आपल्या येलो फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सुरु ठेवत, अभिनेत्रीने नुकताच रोटी बँक फाउंडेशनचान तिन दौरा केला. जॅकलीन मुंबई पुलिस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करणार असून या कठीण काळात तिने भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी पुढाकार घेतला आहे.  जॅकलिनने रोटी बँक माध्यमातून, या महिन्यात एक लाख लोकांपर्यंत जेवण पोहोचवणार आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरुन तिने स्वत: जेवणचे वाटप लोकांना केल होते.

येलो फॉऊंडेशनची स्थापना केल्याचे जाहीर करताना जॅकलिनने सांगितले होते की, जॅकलिनने आपल्या सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट शेअर करताना लिहिले, आपल्याकडे एकच जीवन आहे, या जगात जे काही आपल्याला करता येईल ते केले पाहिजे.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस