Join us  

अमृता सिंहचे सैफ अली खानसह लग्न तुटण्यामागे हे होते कारण, म्हणून थाटला करिनासह दुसरा संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 10:11 AM

2004 साली सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट झाला. दरम्यान, अमृतानं आपल्याला शिव्या दिल्या आणि छळलं देखील असा आरोप सैफ अली खाननं एका मुलाखतीदरम्यान केला होता.

छोटे नवाब अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी बेगम करीना कपूर खान यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना रस असतो. अनेकवेळा सैफअली खानने करि नासह दुस-या लग्नाबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत असतात. २००८ मध्ये 'टशन' सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सैफ आणि करिना पहिल्यांदा भेटले. करिनानेही शाहिदसोबत त्याच काळात ब्रेकअप केलं होतं. चित्रीकरणादरम्यान दोघांनाही एकमेकांना ओळखायला आणि समजून घ्यायला वेळ मिळाला. त्याचदरम्यान यांच्यात घट्ट मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.  

सैफअली खानने पहिली पत्नी अमृताला घटस्फोट देण्यामागे एक वेगळेच कारण होते. हॉट मुलीशी लग्न झालं असतं तर चांगलं झालं असतं असे खुद्द सैफनेच एका मुलाखतीत सांगितले होते.यावरून अनेक चर्चाही झाल्या होत्या. तुम्ही जिच्यासोबत मजा- मस्ती करू शकता अशा मुलीशी लग्न करा, वयाने कमी असलेल्या मुलींसोबत लग्न करण्याचा सल्लाही सैफने त्याच्या चाहत्यांना दिला होता. अमृतासह लग्न केल्याचा पश्चाताप सैफला झाला होता.

2004 साली सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट झाला. दरम्यान, अमृतानं आपल्याला शिव्या दिल्या आणि छळलं देखील असा आरोप सैफ अली खाननं एका मुलाखतीदरम्यान केला होता. सैफ आणि अमृताला इब्राहिम आणि सारा अली खान अशी दोन मुलं देखील आहेत.

ब्रेकअप जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे. मीदेखील हे अनुभवलं आहे आणि विचार करतो की कदाचित यापेक्षा वेगळं काहीतरी व्हावे. असं होऊ शकत नाही की या सर्व गोष्टींचा त्रास मलाही झाला. खूप साऱ्या गोष्टी असतात ज्यांना सांभाळणं कठीण जातं. मी हा विचार करून स्वतःला समजवतो की त्यावेळी मी फक्त २० वर्षांचा होतो आणि जवान होतो.

टॅग्स :सैफ अली खान अमृता सिंगकरिना कपूर