Join us  

करियर फ्लॉप झाल्यानंतर या अभिनेत्रीनं बॉलिवूडला केला रामराम, आता दिसतेय अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 2:09 PM

बॉलिवूडमधून ही अभिनेत्री गायब झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर आज ४३वा वाढदिवस साजरा करते आहे. ईशाला 'कृष्णा कॉटेज' चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिच्या करियरमध्ये बरेच चढउतार आले. सध्या ती बॉलिवूडमधून गायब झाली आहे.

१९ सप्टेंबर, १९७६ साली मुंबईत जन्मलेली ईशाने तिच्या करियरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली. फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या ईशाने १९९५मध्ये मिस इंडियामध्ये सहभाग घेतला आणि तिथे मिस टॅलेंटचा किताब जिंकला. त्यानंतर १९९८ साली तमीळ चित्रपट चंद्रलेखामधून तिने पदार्पण केलं. तोपर्यंत तिला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली नव्हती.

या चित्रपटानंतर ईशाने तमीळ, तेलगू, कन्नड व मराठी चित्रपटात काम केलं. ग्रॅज्युएट झाल्याच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदा ईशा फिजा चित्रपटात करिश्मा कपूर व हृतिक रोशन सोबत झळकली. त्यानंतर प्रकाश झाच्या राहुल चित्रपटात तिने आयटम नंबर केलं. डरना मना है, कयामत, दिल का रिश्ता, पिंजर, मैंने प्यार क्यूँ किया व कृष्णा कॉटेज चित्रपटात तिने काम केलं. 

बॉलिवूडमध्ये दहा वर्षे स्ट्रगल केल्यानंतर ती तितकी कमाल दाखवू शकली नाही. चित्रपट न चालल्यामुळे तिने स्टेज शो व व्हिडिओ अल्बममध्ये काम केलं. बरेच आयटम साँग्स केले. जे आजही हिट आहे.

तिचे बच के तू रहना हे आयटम साँग खूप लोकप्रिय झालं आणि तेव्हापासून तिला खल्लास गर्ल असं संबोधलं जावू लागलं. याच दरम्यान ईशाचं नाव इंदर कुमारसोबत जोडलं गेलं. मात्र त्याला असलेल्या दारूच्या व्यसनामुळे त्या दोघांचं ब्रेकअप झालं. इंदर कुमारचं हल्लीच निधन झालं आहे.

बॉलिवूडमधील करियरसाठी अपयश आल्यानंतर ईशाने २००९ साली बॉलिवूडमधून गायब झाली आणि हॉटेलियर टिमि नारंगसोबत लग्न केलं होतं. ईशाला एक मुलगी आहे.

ईशा भलेही बॉलिवूडमध्ये जास्त प्रचलित झाली नसली तरी ती कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. इतकंच नाही तर ईशा कोप्पीकर राजकारणात सक्रीय आहे. ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत भाजपमध्ये सहभागी झाली होती.

ईशा तिचा नवरा व मुलीसोबत जगभरात फिरत असते आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

तसेच सध्या ती दाक्षिणात्य सिनेमांचं शूटिंग करत आहे.

टॅग्स :इशा कोप्पीकर