Join us  

हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता लपवतोय चेहरा, विमानतळावर दिसला व्हिलचेअरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 1:22 PM

हा अभिनेता लोकांपासूनच चेहरा का लपवतोय, तो व्हिलचेअरवरून का गेला असे अनेक प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांना पडले आहेत. 

ठळक मुद्दे प्रसारमाध्यमांच्या कॅमेराने इरफानला टिपू नये यासाठी त्याने आपला चेहरा स्कार्फने झाकला होता. तसेच त्याने डोक्यावर टोपी घातली होती. तसेच इरफान चालत न जाता तो व्हिलचेअरवरून गेला.

बराच काळ न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी सामना केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता इरफान खान काही महिन्यांपूर्वी भारतात परतला आणि त्याने 'हिंदी मीडियम' चित्रपटाचा सीक्वल असलेल्या 'अंग्रेजी मीडियम' च्या शूटिंगला सुरुवात देखील केली. हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झालेला हिंदी मीडियम चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटाचे भारतातील चित्रीकरण आटोपल्यानंतर इरफान काही दिवसांपासून या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण करत आहे. पण आता या चित्रपटाचे लंडनमधील चित्रीकरण संपवून तो भारतात परतला आहे. त्याला नुकतेच मुंबई एअरपोर्टवर पाहाण्यात आले.

इरफानचा एक वेगळाच अंदाच मुंबई एअरपोर्टवर पाहायला मिळाला. प्रसारमाध्यमांच्या कॅमेराने इरफानला टिपू नये यासाठी त्याने आपला चेहरा स्कार्फने झाकला होता. तसेच त्याने डोक्यावर टोपी घातली होती. तसेच इरफान चालत न जाता तो व्हिलचेअरवरून गेला. इरफान लोकांपासूनच चेहरा का लपवतोय, तो व्हिलचेअरवरून का गेला असे अनेक प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांना पडले आहेत. 

काही दिवसांपूर्वी 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. या पोस्टरमध्ये इरफान मिठाईच्या दुकानाबाहेर उभा असलेला दिसतो आहे आणि या दुकानाचे नाव आहे घसीटेराम मिष्ठान्न भंडार. हे मिठाई आणि नमकीनचे दुकान आहे. अंग्रेजी मीडियम चित्रपटात मिठाईच्या दुकानाचा मालक असलेल्या चंपकजीच्या भूमिकेत इरफान दिसणार आहे. 

अंग्रेजी मीडियम चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करत असून दिग्दर्शन होमी अदाजानिया करत आहेत. या चित्रपटात इरफानसोबत दीपक डोबरियाल व राधिका मदन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या कलाकारांसोबत पंकज त्रिपाठी या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. 

इरफान खानने मागील वर्षी म्हणजेत १६ मार्च 2018 ला आपल्या आजाराची माहिती ट्विटरवर दिली होती. त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांना चांगलाच धक्का बसला होता. इरफान लवकर बरा व्हावा यासाठी त्याच्या चाहत्यांनी आणि बॉलिवूडमधील मंडळींनी प्रार्थना देखील केल्या होत्या. इरफान नऊ-दहा महिन्यांच्या उपचारानंतर भारतात परतला.  

टॅग्स :इरफान खानपंकज त्रिपाठीकरिना कपूर