Join us

​इरफान खान साकारणार ‘मिसाईल मॅन’ एपीजे अब्दुल कलाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 15:58 IST

भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) नुकताच एक विक्रम आपल्या नावे केला. इस्रोने एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करीत इतिहास घडविला. ...

भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) नुकताच एक विक्रम आपल्या नावे केला. इस्रोने एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करीत इतिहास घडविला. इस्रोच्या विकासात मोलाचा वाटा उचणारे भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन म्हणून ख्याती असलेले डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ‘ए.पी.जे.’ चरित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कलाम यांचा जीवनपट मांडण्यात येणार आहे. या चित्रपटात डॉ. कलाम यांच्या भूमिके साठी इरफान खानला विचारणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र पुस्तक रुपात उपलब्ध आहे. त्यांच्या कामगिरीचा उल्लेख करण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती प्रमोद गोरे करीत आहेत. ‘ए.पी.जे.’ या  चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.  चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरहून या चित्रपटाचे पोस्टर शेअर के ले आहे. ‘एव्हरी एज हॅज अ हिरो, एव्हरी हिरो हॅज अ स्टोरी’ असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. या चित्रपटाच्या इंग्रजी भाषेतील चित्रिकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याचा उल्लेख देखील आदर्श यांनी केला आहे.‘ए.पी.जे’ची कथा निश्चितच प्रभावी असली तरी त्यांचे व्यक्तिमत्व पडद्यावर साकारणे ही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच या भूमिकेसाठी प्रमोद गोरे यांनी बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्ही गाजवणाºया इरफान खानला विचारणा केल्याची देखील माहिती समोर आली होती. इरफान ही भूमिका करणार की नाही, याबद्दल अजून निश्चित काही कळलेले नाही. मात्र इरफान किंवा नवाजुद्दीन सिद्दीकी हे दोघेच त्यांच्या भूमिकेचे आव्हान पेलू शकतात, असे त्यांनी म्हटले होते. ‘द गांधी’ हा आपल्याकडचा आजवरचा सर्वोत्तम चरित्रपट आहे. रिचर्ड अँटेनबरो यांनी ज्या ताकदीने तो चित्रपट केला त्याच प्रभावीपणे कलाम यांच्यावरच्या चित्रपटाची हाताळणी असायला हवी आणि म्हणूनच हॉलिवूड दिग्दर्शकाकडे हा चित्रपट सोपविण्याचा विचार करत असल्याचे गोरे यांनी म्हटले होते.