Join us

'ऐ मोहब्बत' मध्ये इरफान-कंगणा एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:30 IST

इरफान खान आणि कंगणा रणावत हे दोघेही वेगवेगळ्या मुडचे कलाकार आहेत. मात्र, दोघांच्याही अभिनयामुळे चाहते खुश आहेत. आत्तापर्यंत एका ...

इरफान खान आणि कंगणा रणावत हे दोघेही वेगवेगळ्या मुडचे कलाकार आहेत. मात्र, दोघांच्याही अभिनयामुळे चाहते खुश आहेत. आत्तापर्यंत एका चित्रपटात या दोघांनीही काम केलेले नाही. गझल आणि ठुमरी गायिका बेगम अख्तरच्या जीवनाला मोठय़ा पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. 'ऐ मोहब्बत' नावाच्या चित्रपटात इरफान आणि कंगणा हे दोघे एकत्र दिसणार आहेत. अनूप जलोटा आणि ऐ मोहब्बत प्रोडक्शनतर्फे बेगम अख्तर च्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचे आवाहन केले होते. निर्माता केतन मेहता दिग्दर्शक असून इरफान मुख्य भूमिकेत असेल. कंगणाविषयी अद्याप काही निश्‍चित झाले नसून ए.आर.रहमान हे चित्रपटाला संगीत देणार आहेत.