Join us  

 जुही चावलाच्या अलिशान घराची झलक, पाहा Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 5:18 PM

श्रीलंकन आर्किटेक्ट चन्ना दसवाट्टे यांनी जुहीचे घर डिझाईन केले आहे.

ठळक मुद्देअनेक वर्षे जुहीच्या लग्नाची भणकही कुणाला लागली नाही. तिने अगदी पद्धतशीरपणे हे लग्न जगापासून लपवून ठेवले होते.

बॉलिवूड स्टार्सची लाईफस्टाईल शानदार असते. यापैकीच एक स्टार म्हणजे जुही चावला. जुही चावला मुंबईत मलबार हिल्स भागात राहते. तिच्या घराचे फोटो पाहाल तर पाहतच राहाल. होय, घरातील कोपरा अन् कोपरा असा काही सजवलाय की, त्यावरून नजर हटत नाही.

श्रीलंकन आर्किटेक्ट चन्ना दसवाट्टे यांनी जुहीचे घर डिझाईन केले आहे. ते सुद्धा वास्तूशास्त्रानुसार. चन्ना यांनी यापूर्वी भारतातील अनेक प्रोजेक्टवर काम केले आहे. या घराची झलक दाखवणारे काही फोटो समोर आले आहेत.

जुहीच्या घरातून मरीन ड्रायव्ह दिसत आहे. गच्चीवरून मरीन ड्राईव्हचा नजारा अगदी स्पष्ट दिसतो. घराच्या छतावर महागडे फर्निचर ठेवण्यात आले आहे. यात 8 सीटर डायनिंग टेबल आणि काही महागडे नक्षीकाम केलेले स्टॅच्यू आहेत.

जुही चावलाचे हे घर तिचे पती जय मेहता यांच्या आजोबांनी 1940 साली  खरेदी केले होते. या घरात जुही चावला, जय मेहता आणि त्यांची मुले राहतात.  एका मजल्यावर जय मेहता यांचे काका देखील राहतात.

जुहीला जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुले आहे. सोशल मीडियावर फार क्वचितच ती या दोघांचे फोटो पोस्ट करते. या दोघांनाही प्रसारमाध्यमे आणि झगमगाटापासूनच दूर ठेवण्याचे तिने पसंत केले.  1995 साली जुहीने बिझनेसमॅन जय मेहतासोबत लग्न केले.

अनेक वर्षे जुहीच्या लग्नाची भणकही कुणाला लागली नाही. तिने अगदी पद्धतशीरपणे हे लग्न जगापासून लपवून ठेवले होते. होय, एका  मुलाखतीत जुहीने लग्न लपवण्यामागच्या कारणांचा खुलासा केला होता.

ती म्हणाली, ‘त्यावेळी इंटरनेट नव्हते. प्रत्येक फोनमध्ये कॅमेराही नव्हता. त्यामुळे माझे लग्न झालेय, हे लपवणे सहज शक्य झाले. लग्न झाले त्यादरम्यान मी यशाच्या शिखरावर होते. मला लग्नानंतरही काम करायचे होते. लग्नाचा खुलासा केला तर करिअर संपेल, अशी भीती मला होती. त्यामुळे मी शांत बसले आणि काम करत राहिले.’

टॅग्स :जुही चावला