Join us

भारतात कधीच असहिष्णुता जाणवली नाही- अदनान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 05:32 IST

प्रत्येकाचे अनुभव हे त्यांचे वैैयक्तिक असतात. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि भारतात तो प्रत्येकाला मिळाला आहे. मला ...

प्रत्येकाचे अनुभव हे त्यांचे वैैयक्तिक असतात. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि भारतात तो प्रत्येकाला मिळाला आहे. मला या देशात कधीच असहिष्णुता जाणवली नाही, असे मत मूळचा पाकिस्तानी असलेला गायक अदनान सामी याने भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर व्यक्त केले. दिल्लीत झालेल्या समारंभात गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी अदनान सामी याला नागरिकत्व मंजूर केले. यावेळी त्याची पत्नी रोया उपस्थित होती. आपला हा नवा जन्म असल्याचे अदनानने सांगितले. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले आहेत. भारतसरकारने मला दिलेली ही अप्रतिम भेट आहे, असे त्याने आनंद व्यकत करताना म्हटले आहे. अदनान हा पाकिस्तानी असूनही भारतात तो अतिशय लोकप्रिय गायक-