Join us

इम्तियाज अली पुस्तक लेखनात व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:35 IST

सध्या 'तमाशा' च्या पोस्ट प्रोडक्शन कामांमध्ये व्यस्त असणारे दिग्दर्शक इम्तियाज अली एका पुस्तकाच्या लिखाणाचे कामही करत आहेत. चित्रपटाची कथा ...

सध्या 'तमाशा' च्या पोस्ट प्रोडक्शन कामांमध्ये व्यस्त असणारे दिग्दर्शक इम्तियाज अली एका पुस्तकाच्या लिखाणाचे कामही करत आहेत. चित्रपटाची कथा कशी लिहावी, कथा लिहिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात तसेच कोणत्या गोष्टी टाळाव्यात या संबंधीचे हे पुस्तक आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये नव्याने येणार्‍या पटकथाकारांना या पुस्तकाचा उपयोग होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. पुस्तक लिहिण्याचे काम आपण खूप एन्जॉय करत असल्याचे इम्तियाज यांनी सांगितले. 'जब वी मेट' साठी इम्तियाज अली यांना 'बेस्ट डायलॉग अँवॉर्ड' मिळाला होता.