मी आयटम गर्ल नाही- श्वेता शर्मा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:08 IST
श्वे ता शर्मा हिने 'चार्ली के चक्कर मैं' चित्रपटात तीन गाणे चित्रीत केले आहेत. यात नसीरूद्दीन शाह असून तिला ...
मी आयटम गर्ल नाही- श्वेता शर्मा...
श्वे ता शर्मा हिने 'चार्ली के चक्कर मैं' चित्रपटात तीन गाणे चित्रीत केले आहेत. यात नसीरूद्दीन शाह असून तिला आयटम गर्ल म्हणण्यात येते यावर तिचा विश्वास नाही. ती म्हणते,' बॉलीवूडमधील कोणत्याही डान्सरला आयटम गर्ल म्हणणे हा माझ्यासाठी एक गंभीर प्रश्न आहे. काही लोकांनी मला आयटम गर्ल ठरवले आहे. पण मला आयटम गर्ल म्हणलेलं बिल्कुल आवडत नाही. आयटम गर्ल कोणाला म्हणतात ? तर ज्या मुली त्यांचे अंगप्रदर्शन करतात आणि डान्स करून परफॉर्म करतात. मी गाण्यांमधून कथानक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जर माझे गाणे पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की, मी फक्त माझा संदेश पोहोचवण्यासाठी गाण्याचा आधार घेतला.