इलियाना...हे वागणं बरं नव्हं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 17:41 IST
‘बर्फी’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूज लवकरच अक्षय कुमारसोबत ‘रूस्तम’मध्ये दिसणार आहे. काल इलियाना एका प्रमोशनल इव्हेंटसाठी बेंगळुरुच्या ...
इलियाना...हे वागणं बरं नव्हं...
‘बर्फी’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूज लवकरच अक्षय कुमारसोबत ‘रूस्तम’मध्ये दिसणार आहे. काल इलियाना एका प्रमोशनल इव्हेंटसाठी बेंगळुरुच्या मॉलमध्ये पोहोचली. अभिनेत्री इलियानाला मॉलमध्ये पाहून सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. तिची एक झलक पाहण्यासाठी लोक आतूर झाले. अशावेळी इलियानाने काय करावे? एका आरशासदृश वस्तूवर नजर पडताच इलियानाने पर्समधून लिपस्टिक काढली आणि ओठांवर लावू लागली. एवढ्या लोकांसमोर इलियानाचे हे बालिश वागणे सर्वांनाच अचंबित करून गेले, हे सांगणे नकोच...यावेळी आदित्य रॉय कपूर हाही इलियानासोबत होता...