Join us

इलियाना म्हणते, "मी स्वत:ला सेलिब्रेटी समजत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 15:50 IST

इलियाना डीक्रूजने 2006 पासून आपल्या करिअरला सुरुवात केली. २०१२ मध्ये इलियानाने ‘बर्फी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. एका ...

इलियाना डीक्रूजने 2006 पासून आपल्या करिअरला सुरुवात केली. २०१२ मध्ये इलियानाने ‘बर्फी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. एका मुलाखतीत इलियाने सांगितले मी स्वत:ला स्टार वैगरे समजत नाही. इलियाने सप्टेंबरमध्ये एक ब्राँड व्हिडीओचे शूट केले होते. याठिकाणी इलियानाने आपल्या 15 वर्षांपासून शरीरिक असंतुलना संबंधी विकारबाबत उघडपणे चर्चा केली. मात्र लोक याबाबत स्वत: उघडपणाने बोलत नाहीत. मी एकेकाळी डिप्रेरशनची शिकार ठरले होते. त्या काळात माझ्या मनात रोज आत्महत्येचे विचार यायचे. मी कायम माझ्या शरिराबद्दल विचार करायची आणि स्वत:तील कमतरता बघून निराश व दु:खी व्हायची. याचे कारण मला नंतर कळले. याचे कारण मी डिप्रेशन आणि बॉडी डिस्मॉर्फिक डिसआॅर्डरची रूग्ण होते. मला कुणीच स्वीकारणार नाही, असे मला कायम वाटत राहायचे. मी स्वत:ला स्वीकारणे सुरु केले आणि अर्धी लढाई जिंकली. डिप्रेशन कुठलाच भ्रम नाही. तर ते मेंदूतील एक रासायनिक असंतुन आहे आणि यावर उपचार गरजेचे आहेत. पायाला इजा झाली की, तुम्ही डॉक्टरकडे जाता. अगदी त्याचप्रमाणे डिप्रेशनवरही उपचारांची गरज आहे, असे ती एका मुलाखती दरम्यान म्हणाली होती.इलियाने आपण स्वत:ला सेलिब्रेटी समजत नसल्याचे सांगितले. मी सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगते. इलियाना कधीच आपल्या खासगी आयुष्याबद्दल फार काही लपवताना दिसत नाही. त्यामुळेच इलियानाच्या आयुष्यात प्रेम आले आणि तिने ते सगळ्यांसमोर मान्य केले. काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो शेअर करतानाही ती जराही संकोचत नाही. इलियानाचा बॉयफ्रेन्ड अ‍ॅन्ड्र्यू एक फोटोग्राफर आहे. आॅस्ट्रेलियात राहणा-या अ‍ॅन्ड्र्यूला इलियानाचे फोटो काढणे आवडते. इलियानाचे अनेक फोटो त्याने काढले आहेत. रूस्तम, मैं तेरा हिरो, मुबारका अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. अलीकडे इलियानाचा ‘बादशाहो’ रिलीज झाला होता. यात ती अजय देवगणच्या अपोझिट दिसली होती. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवली नाही. पण यातील इलियानाच्या भूमिकेचे मात्र चांगलेच कौतुक झाले होते.