Join us  

एक मदत अशीही...! IForIndia म्हणत 85 बॉलिवूड स्टार्सनी भरवली LIVE मैफल, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 12:50 PM

#IForIndia : गरीबांच्या मदतीसाठी बॉलिवूड पुन्हा एकजूट

एकीकडे देशात कोरोना व्हायरसचा कहर वाढतोय. या व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनही वाढतोय. सगळे काही ठप्प असल्याने हजारो गरीब कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत. या गरीबांच्या मदतीसाठी बॉलिवूड पुन्हा एकजूट झालेले दिसतेय. होय, काल रात्री बॉलिवूडच्या 85 सेलिब्रिटींनी एकत्र येत एका लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले. आय फॉर इंडिया नामक या कॉन्सर्टमध्ये आलिया भट पासून शाहरूख खान, आमिर खान, रणवीर सिंग, सैफ अली खान, अर्जुन कपूर, अक्षय कुमार, प्रियंका चोप्रा, अमिताभ बच्चन असे सगळे सहभागी झालेत.केवळ बॉलिवूड स्टार्सच नाहीत तर या कॉन्सर्टमध्ये केविन जोनास, निक जोनास, सोफी टर्नर असे हॉलिवूड स्टार्सही दिसले. या लाइव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून स्टार्सनी एक मोठी रक्कम जमा केली. या रकमेतून गरजूंना मदत केली जाणार आहे.या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये कुणी गाणे ऐकवले, कुणी कविता ऐकवली तर कुणी आपल्या मनातील गोष्टी शेअर केल्यात. सैफ अली खानने कोरोना व लॉकडाऊनच्या काळात गरिबांना मदत करण्याचे आवाहन केले.शाहरूख यावेळी गाताना दिसला तर त्याचा मुलगा अबराम डान्स करताना दिसला.तेव्हा पाहा तर या लाइव्ह कॉन्सटचे काही निवडक व्हिडीओ....

टॅग्स :बॉलिवूडकोरोना वायरस बातम्या