Join us

​ दारू नसेल तर बिहारात जायचे कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 21:26 IST

देशातील ज्वलंत विषयांवर परखड मत मांडून वाद ओढवून घेणारी अभिनेते ऋषी कपूर यांनी आता बिहारमधील दारूबंदीवरही असेच वादग्रस्त मत ...

देशातील ज्वलंत विषयांवर परखड मत मांडून वाद ओढवून घेणारी अभिनेते ऋषी कपूर यांनी आता बिहारमधील दारूबंदीवरही असेच वादग्रस्त मत मांडले आहे. दारू नाही, मग मी बिहारमध्ये पायही ठेवणार नाही, असे वादग्रस्त टिष्ट्वट त्यांनी केले आहे. शिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही टीका केली आहे.नितीश कुमार सरकारने बिहारात दारूबंदी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. ऋषी कपूर यांनी या निर्णयावर एकापाठोपाठ एक असे अनेक टिष्ट्वट करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘जगात सर्वच ठिकाणी दारूबंदीचे प्रयत्न फसले. दारूबंदीच्या निर्णयामुळे बिहारात स्मगलिंग, काळाबाजार वाढेल. शिवाय सरकारचा ३ हजार कोटींचा महसूलही बुडेल. तेव्हा जागे व्हा’असे एक टिष्ट्वट त्यांनी केले आहे. दारूचा साठा करणाºयांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद बिहारच्या कायद्यात करण्यात आली आहे. यावरही ऋषी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.‘ दारूचा साठा करणाºयांना १० वर्षांची कैद आणि बेकायदा शस्त्र बाळगणाºयांना ५ वर्षे शिक्षा! वाह, नितीश,’असे दुसरे टिष्ट्वटही त्यांनी केले आहे.
  1. " data-follows-you="false" data-item-id="717381119511961600" data-name="Rishi Kapoor" data-permalink-path="/chintskap/status/717381119511961600" data-screen-name="chintskap" data-tweet-id="717381119511961600" data-user-id="105710210" data-you-block="false" data-you-follow="false" >

    10 years imprisonment for alcohol-5 years for illegal possession of ARMS? Wah Nitesh! Me no coming to Bihar!How myopic can you get in 2016??

  • " data-follows-you="false" data-item-id="717378989124268032" data-name="Rishi Kapoor" data-permalink-path="/chintskap/status/717378989124268032" data-screen-name="chintskap" data-tweet-id="717378989124268032" data-user-id="105710210" data-you-block="false" data-you-follow="false" >
     

    Bihar you will encourage bootlegging and illicit liquor.Prohibition has failed worldwide. Wake up!You will also lose ₹3000 Crs revenue loss

  • स्वत:च्या टिष्ट्वटर अकाऊंटवर त्यांनी ‘कुली’ चित्रपटाचा एक फोटोही शेअर केला आहे. ‘कुली चित्रपटाच्या वेळेपासून मी दारू पीतो आहे’, असे कॅप्शन त्यांनी या फोटोखाली दिले आहे. गंमत म्हणजे, धूम्रपान व मद्यपान आरोगयासाठी हानीकारक असते, त्यापासून दूर राहा, हेही त्यांनी सांगितले आहे. 

    Practising drinking since Coolie days. Waise-Smoking and Drinking is hazardous. People Please abstain from it. Tx!