Join us

​आत्महत्या करेल नाहीतर तुला ठार मारेल...! गुरमीत चौधरीला चाहत्याची धमकी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 16:03 IST

छोट्या पडद्यावरचा ‘राम’  अर्थात गुरमीत चौधरी याला एका चाहत्यामुळे पोलिसांत धाव घ्यावी लागली. एका चाहत्याने गुरमीतच्या इतके नाकी नऊ ...

छोट्या पडद्यावरचा ‘राम’  अर्थात गुरमीत चौधरी याला एका चाहत्यामुळे पोलिसांत धाव घ्यावी लागली. एका चाहत्याने गुरमीतच्या इतके नाकी नऊ आणले की, पोलिसांत जाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठला पर्यायचं उरला नाही. गुरमीतने या चाहत्याचा ब्लॅकमेलिंग मॅसेज आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे.  ‘मला जगभरातील चाहत्यांचे फोन आणि संदेश येतात. पण एक चाहता आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी आत्महत्या करू इच्छितो. मी माझ्या सर्व चाहत्यांवर प्रेम करतो. पण हा असला प्रकार निश्चितपणे त्रासदायक आहे. यातून ताण निर्माण होतो. या फोटोतील व्यक्ती आत्महत्या करण्यासोबतचं मला जीवे मारू इच्छितो,’ असे गुरमीतने लिहिलेयं. शिवाय प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांत तक्रार दाखल केलीयं. यानंतर मुंबई पोलिसांनी गुरमीतला सुरक्षा देण्याची तयारी दाखवली आहे. फोटोतील या व्यक्तिचे नाव अंकित रोयाल असे आहे. गुरमीतने अंकितच्या मॅसेजचे स्क्रीन शॉट्स शेअर केले आहे. यात तो थेट गुरमीतला धमकी देताना दिसतोय. ‘उद्या मी आत्महत्या करेल, तेव्हा तुला कळेल,’असे त्याने म्हटलेय.चाहत्याचे धमकीचे मॅसेज येऊ लागलेत, तेव्हा गुरमीत दुबईत होता. या घटनेनंतर तो लगेच मुंबईत परतला आणि अंकित रोयालविरोधात त्याने तक्रार दाखल करणेच योग्य समजले. संबधित चाहता सोशल मीडियावर माझी प्रतीमा मलिन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने माझ्यावर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत. एक चाहता मला इतका ताप देईल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते, असे गुरमीतने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.ALSO READ : ​गुरमीत चौधरीची होणार टेलिव्हिजन ‘वापसी’!गुरमीत लवकरच ‘पलटन’ या सिनेमात दिसणार आहे. मायावी, रामायण, गीत अशा अनेक मालिकांत काम केल्यानंतर गुरमीत मोठ्या पडद्याकडे वळला. कोई आप सा या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर खामोशियां, मिस्टर एक्स, वजह तुम हो,लाली की शादी में लड्डू दीवाना आदी चित्रपटांत तो दिसला.