Join us

​ओळखा पाहू ‘ही’ हॉट अभिनेत्री कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 18:26 IST

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे एकेकाळी अगदी प्रसिद्धीच्या शिखरावर होते. पण, नंतर अचानक हे कलाकार लाइमलाइटपासून दूर गेले. ...

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे एकेकाळी अगदी प्रसिद्धीच्या शिखरावर होते. पण, नंतर अचानक हे कलाकार लाइमलाइटपासून दूर गेले. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी एकेकाळी बॉलीवूडमधील हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. तिच्या बोल्ड अंदाजाचे लाखो चाहते होते. मात्र, अचानक तिने या इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही बोलतोय अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्याबद्दल. ‘आशिक बनाया आपने’ चित्रपटामध्ये बोल्ड दृश्ये देणारी तनुश्री दत्ता आता पूर्णपणे बदलली आहे. तिचे आताचे फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. दरम्यान, आता तनुश्रीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून ती काही दिवस आश्रमामध्येही राहिली होती.सर्वात प्रतिष्ठेचे मानले जाणारे फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स हे टायटल २००४ साली जिंकल्यानंतर तनुश्री प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर तिने काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले. ‘चॉकलेट’, ‘आशिक बनाया आपने’, ‘डीप डार्क सिक्रेट्स’, ‘गुड बॉय बॅड बॉय’, ‘सास बहू और सेन्सेक्स’ यांसारख्या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजाची बरीच चर्चा झाली होती. तनुश्री शेवटची २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘रमा द सेव्हियर’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर तीन वर्षे लाइमलाइटपासून दूर राहिलेली तनुश्री २०१३ साली एकदम वेगळ्या लूकमध्ये एका पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दिसली.