Join us  

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात आहे रस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 7:00 AM

सारा आपल्या आई वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण साराचा भाऊ इब्राहिमला अभिनय या क्षेत्रात रस नाहीये. 

ठळक मुद्देइब्राहिमचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला देखील आपल्या आजोबांप्रमाणेच क्रिकेटर बनायचे आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटाला अनेक वर्षं झाले असले तरी ते दोघे आपल्या मुलांची जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडताना दिसतात. सैफ आणि अमृताच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी सारा अली खानने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या केदारनाथ या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. त्यानंतर आलेल्या सिम्बा या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले. आता ती लवकरच कार्तिक आर्यनसोबत लव्ह आज कल 2 तर वरुण धवनसोबत कुली नं 1 या चित्रपटात झळकणार आहे. सारा आपल्या आई वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण साराचा भाऊ इब्राहिमला अभिनय या क्षेत्रात रस नाहीये. 

इब्राहिमला अभिनयात नव्हे तर क्रिकेट खेळण्यात रस आहे. त्याचे आजोबा मन्सूर अली खान पतौडी हे प्रसिद्ध क्रिकेटर होते. इब्राहिमचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला देखील आपल्या आजोबांप्रमाणेच क्रिकेटर बनायचे आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 

इब्राहिमच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर क्रिकेट या खेळाची प्रॅक्टिस करतानाचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. इब्राहिम हा खूप चांगला बॅट्समन असून त्याच्या या व्हिडिओंमध्ये तो चौकार आणि षटकार मारत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 

इब्राहिमची नुकतीच झालेली एक क्रिकेट मॅच पाहायला त्याचे वडील सैफ अली खान देखील गेले होते. इब्राहिम आता खरंच क्रिकेटमध्ये करियर करतो की त्याच्या आईवडिलांप्रमाणेच अभिनयक्षेत्राची निवड करतो हे आपल्याला येत्या काळात कळेलच.

टॅग्स :सैफ अली खान अमृता सिंगसारा अली खान