मी नाही नाव बदलणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 19:47 IST
नावात काय? असे विल्यम शेक्सपीयर म्हणाला होता. पण नावासाठीच सर्व काही, असाच आजचा जमाना आहे. नवविवाहित अभिनेत्री प्रीति झिंटा ...
मी नाही नाव बदलणार...
नावात काय? असे विल्यम शेक्सपीयर म्हणाला होता. पण नावासाठीच सर्व काही, असाच आजचा जमाना आहे. नवविवाहित अभिनेत्री प्रीति झिंटा हिलाही आपले नाव अतिशय प्रिय आहे. अमेरिकन प्रियकर ज्यां गुडइनफ याच्यासोबत प्रीति विवाहबंधनात अडकली असली तरी आपले आडनाव बदलण्यास प्रीतिने नकार दिला आहे. मी माझे आडनाव कदापि बदलणार नाही, असे तिने स्पष्ट केले आहे. एका चाहत्याने प्रीतिला याबाबत प्रीतिला विचारले. यावर क्षणाचाही विलंब न लावता, मी माझे नाव अजिबात बदलणार नसल्याचे प्रीति म्हणाली. मी आत्तापर्यंतमाझ्या वडिलांची मुलगीच म्हणून ओळखली गेलीयं, कुणाची पत्नी म्हणून नाही. त्यामुळे माझ्या नावात मी कुठलाही तांत्रिक बदल करणार नाही,असे ती म्हणाली. एका चाहत्याने प्रीतिला पतीबाबतही प्रश्न विचारला. यावर प्रीतिने धम्माल उत्तर दिले. तो ‘गुडइनफ’ आहे, असे उत्तर तिने दिले....आहे ना, खट्याळ !!!