Join us  

मल्लिका शेरावत म्हणाली- मी 20-30 सिनेमा सोडून दिले, बलात्कारांच्या घटनांमुळे होत होती ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 3:14 PM

मल्लिका शेरावत सोशल मीडियावरही सक्रिय असते.

अभिनेत्री मल्लिका शेरावत 2004 मध्ये आलेल्या मर्डर सिनेमामध्ये दिलेल्या बोल्ड सीन्समुळे चांगलीच चर्चेत आली होता. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही ट्रोल्सनी भारतात होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांसाठी मल्लिका शेरावतचे सिनेमे जबाबदार असल्याचे म्हटले होते. या विषयावर उघडपणे बोलताना मल्लिकाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, मलिका म्हणाली 'तडजोड' करण्यास नकार दिल्यामुळे तिला 20-30 चित्रपट मिळाले नाहीत. मी खऱ्या आयुष्यात अजिबात तशी नाही आहे जसे मला चित्रपटात दाखवले जाते. ती म्हणाली, मी चांगल्या कुटूंबातील असूनही, चित्रपट मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

मल्लिका म्हणाली, ''मला 20-30 चित्रपट मिळाले नाहीत कारण मला जे पटत नाही ते मी केले नाही.  जे काही मी स्क्रिनवर करते त्यापेक्षा खऱ्या आयुष्यात मी खूप वेगळी आहे. मी सुरुवातीला विचार केला की मला काय करायचे नाही, ज्यामुळे मी चित्रपट गमावले. पण मला आनंद आहे की मी अजूनही माझ्या स्वत: च्या अटींवर काम करत आहे.''

मल्लिकाच्या सिनेमांना बलात्कारासाठी दोषी ठरवणाऱ्या ट्रोलर्सबाबत ती म्हणाली, अजूनही लोक गुन्हेगारांच्या मानसिकतेऐवजी बलात्कारासाठी चित्रपट, इंटरनेट आणि मुलींच्या कपड्यांना दोष देतात, ज्यावरुन त्यांची स्वत:ची मानसिकता देखील लक्षात येते. 

टॅग्स :मल्लिका शेरावत