Join us  

करिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 3:40 PM

काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये सारा सावत्र आई करिनाबद्दल भरभरून बोलली होती. आता मात्र करिना कपूर साराबद्दल बोलली आहे.

ठळक मुद्देहोय, मी कधीही सारा आणि इब्राहिमची आई होऊ शकत नाही, असे करिना म्हणाली.

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिचा डेब्यू सिनेमा ‘केदारनाथ’ रिलीजसाठी तयार आहे. सैफची बेटर हाफ करिना कपूर खानही साराच्या डेब्यूबद्दल उत्सूक आहे. काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये सारा सावत्र आई करिनाबद्दल भरभरून बोलली होती. आता मात्र करिना कपूर साराबद्दल बोलली आहे. होय,मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत करिना कपूरने सैफ व अमृता सिंग यांच्या सारा आणि इब्राहिम या मुलांबद्दल भाष्य केले.

मी कधीही सारा आणि इब्राहिमची आई होऊ शकत नाही, असे करिना म्हणाली. ‘मी आणि सारा-इब्राहिम केवळ चांगले मित्र होऊ शकतो. मी त्यांची आई कधीही बनू शकणार नाही, हे मी सैफला लग्नाआधीच सांगितले होते. कारण सारा व इब्राहिमजवळ आधीच अमृतासारखी चांगली आई आहे. तिने त्या दोघांना अतिशय प्रेमाने वाढवले आहे. मी केवळ सारा व इब्राहिमला प्रेम करू शकते. त्यांची मैत्रिण बनू शकते. त्यांची आई होणे मला जमणार नाही. त्यांना जेव्हा केव्हा माझी मदत आणि सल्ला लागेल, त्यावेळी मी कायम त्यांच्यासोबत असेल,’असे करिना यावेळी म्हणाली.

साराच्या डेब्यूबद्दल विचारले असता, सारा ही जन्मत:च एक स्टार आहे. तिच्यात सौंदर्य आणि बुद्धी दोन्हींही आहेत. ती तिच्या बोलण्याने कुणालाही प्रभावित करू शकते. भविष्यात ती एक मोठी स्टार होणार, यात मला जराही शंका नाही, असे करिना म्हणाली.अलीकडे सारानेही ‘कॉफी विद करण 6’ मध्ये बोलताना मी कधीच करिनाला ‘छोटी माँ’ म्हणून बोलवणार नाही, असे म्हटले होते. मी करिनाला ‘छोटी माँ’ म्हटले तर ती कमालीची नर्व्हस होईल आणि प्लीज असे काही म्हणू नकोस, असे मला म्हणेल, असे सारा म्हणाली होती.

टॅग्स :करिना कपूरसारा अली खानसैफ अली खान