मला माझ्या मुलीचा अभिमान-बिग बी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 13:44 IST
प्रत्येक वडिलांना आपल्या मुलीचा अभिमान असतोच. मग ते सामान्य असो की सेलिब्रिटी... बच्चन कुटुंबियांतील लाडकी परी श्वेता बच्चन हिने ...
मला माझ्या मुलीचा अभिमान-बिग बी
प्रत्येक वडिलांना आपल्या मुलीचा अभिमान असतोच. मग ते सामान्य असो की सेलिब्रिटी... बच्चन कुटुंबियांतील लाडकी परी श्वेता बच्चन हिने नुकताच डिझायनर अबू जानी-संदीप खोसला यांच्यासाठी रॅम्पवॉक केला. ती रॅम्पवॉक करत असताना एक व्यक्ती मोठ्या अभिमानाने खुश होऊन टाळ्या वाजवत होते. कोण असेल बरे ती व्यक्ती? श्वेताचे वडील म्हणजेच बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन. गौरव, कौतुक आणि आनंदाने त्यांचा ऊर भरून आला होता. स्वत:च्या मुलीला रॅॅम्पवॉक करताना पाहून डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. त्यांनी त्यांचा आनंद टिवटरवर फोटो शेअर करून व्यक्त केला. पोस्टद्वारे ते म्हणाले,‘द वर्ल्ड्स मोस्ट ब्युटीफुल डॉटर.’ ‘अॅण्ड द मोस्ट ब्युटीफुल डॉटर इन द वर्ल्ड वॉक्स द रॅम्प फॉर खोसला - जानी इंटरनॅशनल..अ व्हेरी व्हेरी प्राऊड फादर...’ या रॅम्पवर वॉक करताना श्वेताने पांढऱ्या रंगाचा सुंदर गाऊन घातलेला होता. तसेच तिच्या डोक्यावर असलेल्या मुकूटावर छोटीछोटी पिसं लावण्यात आली होती. त्यामुळे ती एखाद्या परीसारखी दिसत होती. यावेळी तिचे आई-वडील जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यासह भाऊ अभिषेक बच्चन हा देखील उपस्थित होता. फक्त एकजण मिसिंग होतं...कोण ओळखा पाहू? ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या अभिषेक बच्चन. ऐश या सोहळ्यासाठी का आली नाही? हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. त्यामुळे त्यावर जास्त चर्चा न केलेलीच बरी. नाही का?