I AM INDIAN : प्रियांका चोप्रा म्हणते,‘भारतीय हीच माझी ओळख’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 18:23 IST
प्रसिद्धीच्या बाबतीत ‘लोकल टू ग्लोबल’ असा प्रवास केलेली गुणी अभिनेत्री आणि ‘देसी गर्ल ’ म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा ...
I AM INDIAN : प्रियांका चोप्रा म्हणते,‘भारतीय हीच माझी ओळख’
प्रसिद्धीच्या बाबतीत ‘लोकल टू ग्लोबल’ असा प्रवास केलेली गुणी अभिनेत्री आणि ‘देसी गर्ल ’ म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा भारतीय असल्याचा तिला सार्थ अभिमान व्यक्त करते आहे. ‘भारतीय हीच माझी खरी ओळख असल्याचे ती सांगते आहे. ती जगाच्या पाठीवर कु ठेही गेली तरी तिचा स्वभाव तिला भारतीयत्वाचा बाणा सोडू देत नाही, अशी कबुलीही तिने दिली आहे. ALSO READ : Baywatch : समर पोस्टर्समध्येही प्रियंका चोपडाच्या को-स्टार्सनीच लावला बोल्डनेस तडकामुंबईत आल्यावरच प्रियांकाच्या करिअरला योग्य दिशा मिळाली. आजही तिला स्वत:ला ‘मुंबईची मुलगी’ म्हणवून घ्यायला कमालीचा आनंद वाटतो. अलीकडेच २६ जानेवारीला तिने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा देऊ केल्या. त्यावेळी ती हे सांगायला विसरली नाही की, ‘मी कुठेही असले तरीही माझी ओळख एक भारतीय अशीच आहे. भारताच्या सैन्यदलाची मी स्वत:ला मुलगी मानते.’ ALSO READ : Women's March: डोनाल्ड ट्रम्पविरोधात एकवटल्या प्रियांका चोप्रा आणि नर्गीस फाखरीप्रियांका चोप्रा ही सध्या न्यूयॉर्क येथे ‘क्वांटिको’ मालिकेच्या दुसऱ्या सीजनची शूटिंग करत आहे. तसेच ती द्वेने जॉनसन आणि झॅक एफ्रॉन यांच्यासोबत आगामी ‘बेवॉच’ चित्रपटातही झळकणार आहे. हा चित्रपट मे महिन्यात रिलीज होणार असून या चित्रपटासाठी तिने विशेष मेहनत घेतल्याचे कळतेय.