Join us  

Hyderabad Case: अनेकांनी केले कौतुक; पण ही अभिनेत्री म्हणाली, हा न्याय नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 12:02 PM

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार मारण्यात आले आणि देशभर प्रतिक्रिया उमटल्या. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ठळक मुद्देसाऊथचा सुपरस्टार नागार्जुन यानेही या घटनेनंतर ट्विट केले.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार मारण्यात आले आणि देशभर प्रतिक्रिया उमटल्या. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या असून बहुतांश बॉलिवूड सेलिब्रिटींनी तेलंगणा पोलिसांचे कौतुक करत, शाब्बासकी दिली आहे. अर्थात अभिनेत्री स्वरा भास्कर याला अपवाद आहे.

देशातील प्रत्येक मुद्यावर परखड मत मांडणा-या स्वराने या घटनेवर थेट प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र पत्रकार फाये डिसूजा यांचे ट्विट रिट्विट करत तिने अप्रत्यक्षपणे आपले मत मांडले. ‘हा न्याय नाही. पोलिसांनी कायदा तोडला. हे धोकादायक आहे,’ असे ट्विट फाये डिसूजा यांनी केले आणि स्वराने नेमके हेच ट्विट रिट्विट केले.

ऋषी कपूर, अनुपम खेर, कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेल, साऊथ सुपरस्टार नागार्जुन या सारख्या अनेक सेलिब्रिटींनी मात्र तेलंगणा पोलिसांचे कौतुक केले आहे.

 

शाब्बास तेलंगणा पोलीस, माझ्याकडून तुमचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे.

 

‘जय हो तेलंगणा पोलीस’ अशा शब्दांत अभिनेते अनुपम खेर यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. ‘ क्रूर अपराध करणाºयांविरोधात ज्या लोकांनी आवाज उठवला होता आणि आरोपींना कठीण शिक्षेची मागणी केली होती, त्या सर्वांनी माझ्यासोबत ‘जय हो’ म्हणा, असे ट्विट त्यांनी केले.

 

कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल हिनेही ‘ये नया हिंदुस्तान है, घर मै घुसेगा भी और मारेगा भी...’ या उरी चित्रपटातील डायलॉगचा आधार देत, तेलंगणा पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

साऊथचा सुपरस्टार नागार्जुन यानेही या घटनेनंतर ट्विट केले. ‘आज सकाळी मी उठलो आणि न्याय मिळाला होता,’ असे त्याने लिहिले.

 

टॅग्स :हैदराबाद प्रकरणऋषी कपूरअनुपम खेरस्वरा भास्कर