Join us

​हुमा म्हणते, सोहेल माझ्या भावासारखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 16:01 IST

अभिनेत्री हुमा कुरेशी तशी गुणी अभिनेत्री. पण अलीकडे ती सलमान खानचा भाऊ सोहेल खान याच्याशी असलेल्या मैत्रीमुळेच अधिक चर्चेत ...

अभिनेत्री हुमा कुरेशी तशी गुणी अभिनेत्री. पण अलीकडे ती सलमान खानचा भाऊ सोहेल खान याच्याशी असलेल्या मैत्रीमुळेच अधिक चर्चेत होती. सोहेल आणि हुमा पे्रमात पडल्याच्या चर्चांना यामुळे उधाण आले होते. विशेष म्हणजे, सोहेल व हुमा या दोघांपैकी एकही या विषयावर बोलायला तयार नसल्याने सगळ्यांनीच आपआपले अंदाज बांधणे सुरु केले होते. पण आता हुमाने आपले मौन सोडत, सोहेलसोबत आपले तसले काहीही नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोहेल माझ्या भावासारखा असल्याचे तिने म्हटले आहे. एका वृत्तपत्रास हुमाने अलीकडे मुलाखत दिली. माझ्या आयुष्यात काय चाललंय याबाबत मी माझ्या चाहत्यांशी संवाद साधतच असते. पण खºया-खोट्याची शहानिशा न करता माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या पेरल्या जातात, त्यावेळी मला दु:ख होते. मी माझ्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये माझे स्थान निर्माण केले आहे. कुणाच्या जवळीकीमुळे मी नाव कमावले, असे काहींना भासवायचे असेल तर माझा त्यावर तीव्र आक्षेप आहे, असे हुमा म्हणाली. काही दिवसांपूर्वी सोहेलची पत्नी सीमा हिने त्यांचे राहते घर सोडले होते. त्यामुळे हुमा व सोहेलच्या संबंधांच्या चर्चांना उधाण आले होते. पण काहीच दिवसात सीमा घरी परतली आणि इकडे हुमानेही सांगायचे ते सांगितले. त्यामुळे आता तरी या चर्चेला पूर्णविराम मिळावा, अशी अपेक्षा करू या!