Join us  

रॅम्प वॉक करताना अचानक अंगात आलं की काय! हृतिकची गर्लफ्रेंड सबा आजाद होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 8:53 AM

हा नक्कीच ड्रग्सचा परिणाम...नेटकऱ्यांच्या कमेंट्स

सध्या बॉलिवूडमध्ये एका जोडीची जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि सबा आजाद (Saba Azad). हृतिकची गर्लफ्रेंड म्हणूनच सबा आजकाल ओळखली जाते. पण सबाची आणखी एक ओळख सांगायची तर ती म्हणजे तिचा स्वत:चा बँड आहे. ती आपल्या बँडअंतर्गत सिंगिंग परफॉर्मन्स देते. नुकतंच सबा एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली असता ती रॅम्पवॉक करताना अचानक विचित्र नाचायला लागली. हे पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर थेट ड्रग अॅडिक्ट असल्याचे आरोप लावले. या डान्समुळे तिला आता खूपच ट्रोल केलं जात आहे.

हृतिकची लेडी लव्ह सबा आजाद लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. तिने गोल्डन रंगाचं जॅकेट आणि पँट घातली होती. रॅम्पवॉक करत असतानाच सबा अचानक डुलायला लागली. नंतर तिने उड्या मारत स्टेजवरच विचित्र डान्स करायला सुरुवात केली. अचानक तिला काय झालं हे कोणालाच कळलं नाही. सबाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या प्रकारानंतर सबा चांगलीच ट्रोल होत आहे. 'हिच्या अंगात आले का','हृतिकने हे पाहिलं तर त्याला किती लाज वाटेल' असं म्हणत सबाला ट्रोल केलं जात आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिने ड्र्ग्स घेतल्याचा अंदाज लावला आणि हा त्याचाच परिणाम असल्याची कमेंट केली. सोशल मीडियावर तिचे हे डान्स मूव्ह्ज चांगलेच व्हायरल होत आहेत. 

 

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूडलॅक्मे फॅशन वीक