Join us

हृतिकचा जागतिक टास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:01 IST

जागतिक पर्यावरणाच्या प्रश्नावर पर्यावरण संतुलनासाठी अनिभेता हृतिक रोशन याने एक जागतिक लेसन घेतला आहे. यासाठी एक ग्लोबल गोल कँपेन ...

जागतिक पर्यावरणाच्या प्रश्नावर पर्यावरण संतुलनासाठी अनिभेता हृतिक रोशन याने एक जागतिक लेसन घेतला आहे. यासाठी एक ग्लोबल गोल कँपेन करण्यात येत आहे. युनिसेफने याबाबत पुढाकार घेतला असून, या आठवड्यात आर्मी, सेलिब्रिटी देखील सहभाग नोंदवून पर्यावरण संतुलनासाठी आवाहन करणार आहेत.स्टेफन हॉकिंग, डेव्हीड बेकहॅम, मलाला युसूफजाई यासारखे जागतिक दर्जाचे मान्यवर यात सहभाग घेऊन प्रबोधन करतील. यशराज फिल्मस् यात सहभागी मान्यवरांचे ग्लोबल गोलबाबत व्हिडिओ तयार करणार असून, रेडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याद्वारे आवाहन करण्यात येणार आहे. साधारण ३ बिलीयन नागरिकांपर्यंत हा संदेश देण्यात आला आहे.तसेच विविध क्षेत्रातील १९३ मान्यवरांनी यासाठी साईन केली असून, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ससाठी पुढाकार घेण्याचे मान्य केले आहे. अनेक ठिकाणी सेल्फी, प्लेकार्डस आणि फ्लॅग दाखवून या मोहिमेला सुरुवात करण्यात येतआहे. याचा परिणाम अत्यंत चांगला होणार आहे.