ही आहे, हृतिक रोशनची बहीण सुनयना आधीची अन् आत्ताची!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 11:55 IST
केवळ हृतिक रोशनच नाही तर तुम्हीही बातमीसोबतचा फोटो पाहून अवाक व्हाल. फोटोतील ही महिला कोण आहे, हे कदाचित तुम्हाला ...
ही आहे, हृतिक रोशनची बहीण सुनयना आधीची अन् आत्ताची!
केवळ हृतिक रोशनच नाही तर तुम्हीही बातमीसोबतचा फोटो पाहून अवाक व्हाल. फोटोतील ही महिला कोण आहे, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तर ही आहे हृतिक रोशनची बहीण सुनयना. होय, विश्वास बसत नाहीय, पण हे खरे आहे. राकेश रोशनची मुलगी आणि अभिनेता हृतिकची बहिण सुनयना रोशन. ती कधीच चित्रपटात आली नाही. दोन अयशस्वी लग्न आणि नंतर कॅन्सर सारख्या आजारामुळे तिचे वैयक्तिक आयुष्यात खूप चढउतार येत राहिले. नंतर तिने काइट्स आणि क्रेझी-4 या चित्रपटांची निर्मिती केली. सुनयनाचे वजन लहानपणापासूनच जास्त होते. कदाचित ती चित्रपटात न येण्यामागचे हेही एक कारण असू शकते. गेल्या काही वर्षांत सुनयनाचे वजन बरेच वाढले होते. पण आत्ताची सुनयना तुम्ही बघाल तर तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. होय, अनेक किलो वजन कमी करून सुनयना योग्य फिगरमध्ये पोहोचली आहे. स्वत: हृतिकने सुनयनाचा आधीचा आणि आत्ताचा फोटो शेअर केला असून बहीणीबद्दलचा अभिमान व्यक्त केला आहे. ‘काहीही अशक्य नाही. याला म्हणतात खरा बदल. सो सो प्राऊड आॅफ यू दीदी,’ असे हृतिकने म्हटले आहे. ALSO READ : हृतिक रोशन, आधी आम्ही तुझा आदर करायचो, पण आता...!!एकंदर काय तर हृतिकप्रमाणचे हृतिकच्या बहीणीनेही फिटनेसचा आदर्श घालून दिला आहे. काहीही अशक्य नाही, हे तिने खºया अर्थाने दाखवून दिलेय. त्यामुळे सुनयनाचे अभिनंदन करणे तर बनतेच.सुनयनाचे आत्तापर्यंत दोन लग्न झाली आहेत आणि एकदा साखरपुडा तुटलेला आहे. सुनयनाने पहिले लग्न आशीष सोनीसोबत झाले होते. मात्र २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने मोहन नदारसोबत लग्न केले. मात्र आता दोघेही वेगळे झाले आहेत. कॅन्सरशी लढताना सुनयना पूर्णपणे हिंमत हरली होती. केमोमध्ये सगळे केस गळल्यानंतर ती आरशात पाहणेही टाळायची आणि नुसती रडत बसायची. पण कुटुंबीयांच्या ठोस पाठींब्यामुळे आणि प्रेमामुळे सुनयनाने कॅन्सरला नमवले. सुनयना सध्या तिच्या आई-वडिलांसोबत राहते. पहिल्या पतीपासून तिला एक मुलगीही आहे.