Join us  

जिम जाओ... माईन्ड से सारा कचरा निकल जाएगा...! ‘त्या’ बातमीने भडकला हृतिक रोशन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 6:42 PM

दिशा पटनी हिने हृतिक रोशनच्या फ्लर्टला कंटाळून सिनेमा सोडला, अशी बातमी अलीकडे एका इंटरटेनमेंट पोर्टलने छापली. ही बातमी आली आणि हृतिकचे माथे ठणकले.

भारतीय मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातम्या चवीने वाचल्या जातात. विशेषत: गॉसिप्सच्या नावाखाली मनोरंजन विश्वातील बातम्या सर्रास छापल्या जातात. अनेकदा या बातम्यांमुळे स्टार्सच्या प्रतिमेवर प्रभाव पडतो. अनेकदा स्टार्सच्या खासगी आयुष्यातही अशा बातम्या वादळ निर्माण करणाऱ्या ठरतात. अलीकडे बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन याच्याबद्दल काहीसे असेच घडले. टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटनी हिने हृतिक रोशनच्या फ्लर्टला कंटाळून सिनेमा सोडला, अशी बातमी अलीकडे एका इंटरटेनमेंट पोर्टलने छापली.ऋतिकने दिशासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने दिशाच्या एका जवळच्या मित्राला मॅसेज करुन तिला डेटवर येण्याबाबत विचारले. ही गोष्ट दिशाला अजिबात आवडली नाही आणि याच कारणामुळे नाराज झालेल्या दिशाने सिनेमा सोडून दिला, असे या बातमीत म्हटले होते. दिशासोबतच्या फ्लर्टच्या प्रकरणामुळे टायगरदेखील ऋतिकवर नाराज असल्याचेही या बातमीत म्हटले गेले.ही बातमी आली आणि हृतिकचे माथे ठणकले. मग काय, ही बातमी देणा-या पोर्टलला त्याने फैलावर घेतले. केवळ इतकेच नाही तर मेंदूतील घाण स्वच्छ करण्याचा सल्लाही दिला. संबंधित पोर्टलच्या हेडलाईनचा स्क्रिनशॉट शेअर करत, हृतिकने सोशल मीडियावर यासंदर्भात स्पष्टीकरण दिले.

‘मेरे प्यारे मित्र ‘पत्रिकाजी’, कसरत करते हो? थोडा जिम जाओ. माईन्ड से सारा कचरा निकल जाएगा. खासकर बीस donkey किक्स, बीस monkey रोल अ‍ॅण्ड 2 dog jumps  आप के लिए सही रहेगा. जरूर किजिएगा. गुड लक. गुड डे अ‍ॅण्ड लव्ह यू टू,’असे ट्विट हृतिकने केले.केवळ हृतिकनेचं नाही तर दिशानेही यासंदर्भात संबंधित पोर्टलचे कान उपटलेत. हृतिक सरबद्दल अतिशय बालिश बातमी चालवली गेली. मी सांगू इच्छिते की, या बातमी तसूभरही सत्य नाही. मी त्यांच्यासोबत फार कमी बोलले आहे. पण ते खूप चांगले व्यक्ती आहेत, ते असे काम कधीच करू शकत नाहीत. मी त्यांच्यामुळे कुठलाही चित्रपट सोडलेला नाही. जी बातमी प्रकाशित झालीय, ती धादांत खोटी आहे, असे दिशाने म्हटले आहे. भविष्यात संधी मिळालीचं तर हृतिक रोशन सरांसोबत नक्कीच काम करेल, असेही तिने म्हटले आहे.

टॅग्स :हृतिक रोशनदिशा पाटनी